शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; सलॉन -ब्युटी पार्लर सेवेत २० ते २५ टक्क्यांनी दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:40 IST

सलॉन-ब्युटी पार्लरच्या सेवेत १ जानेवारीपासून वाढ करण्यात आली आहे.

नवीन वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे,  नव्या वर्षांचे सर्वांनीच जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, आज म्हणजेच १ जानेवारी २०२५ पासून सर्वसामान्यांना झटका बसला आहे. आता सलॉन आणि ब्युटी पार्लरच्या सेवेत दरवाढ करण्यात आली आहे. आजपासून या सेवेत २० ते २५ टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे आजपासून सर्वसामान्य ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. 

दरवाढीचा निर्णय राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने घेतला होता. ही दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागात ही दरवाढ होणार आहे. असोएशिएनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी याबाबत माहिती दिली. 

१ जानेवारी २०२५ पासून सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरामध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. यामुळे आता आजपासून केस कापणे महागणार आहे.  वाढती महागाई, जीएसटी वाढ, सलून मधील वस्तुंचे वाढलेले दर या कारणांमुळे दरवाढ केल्याची माहिती असोएशनने दिली आहे.

LPG सिलिंडर झाला स्वस्त

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी एलपीजी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे दर कमी केले आहेत. एलपीजी सिलिंडर आजपासून १४ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. सिलिंडरच्या दरात ही कपात संपूर्ण देशात लागू झाली आहे.मात्र एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातील ही सवलत फक्त १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी असणार आहे. घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

आज वर्षाचा पहिला दिवस असून एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात. तेल विपणन कंपन्यांनी आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. १ जानेवारी २०२५ पासून दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १८०४ रुपये, मुंबईत १७५६ रुपये, चेन्नईमध्ये १९६६ रुपये आणि कोलकातामध्ये १९११ रुपये असेल. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना या दर कपातीचा मोठा फायदा होणार आहे.