शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant Maharashtra : राज्यात आठ जणांना ओमायक्राॅनची बाधा; एकूण संख्या ४० वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 08:10 IST

पुण्यात सर्वाधिक सहा रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळून आले.

मुंबई : राज्यात शुक्रवारी आणखी आठ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळून आल्याने एकूण संख्या ४० वर पोहोचली आहे. पुण्यात सर्वाधिक सहा रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळून आले आहेत, तर मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतून प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या ओमायक्रॉन सर्वेक्षणविषयक माहितीनंतर राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ४० झाली आहे. यात, सर्वाधिक १४ मुंबईत, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे ग्रामीणमध्ये ६, तर पुणे मनपा, कल्याण-डोंबिवली, उस्मानाबादमध्ये प्रत्येकी २ आणि बुलडाणा, नागपूर, लातूर आणि वसई-विरार या ठिकाणी प्रत्येकी एक एक रुग्ण आढळला आहे. 

शुक्रवारी ओमायक्रॉन बाधित आढळलेले सर्व आठ रुग्ण  वय वर्षे २९ ते ४५ या वयोगटातील आहेत. त्यातील ७ रुग्ण लक्षणेविरहित, १ रुग्ण सौम्य स्वरूपाचा आहे. हे सर्व प्रयोगशाळा नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार यापैकी पुणे येथील ४ रुग्णांचा दुबई प्रवास आणि २ रुग्ण निकट सहवासित आहेत. मुंबई येथील एका रुग्णाचा अमेरिका प्रवास आणि कल्याण-डोंबिवली येथील एका रुग्णाचा नाजेरिया प्रवास झाला आहे. या ८ रुग्णांपैकी २ जण रुग्णालयात तर ६ जण घरीच विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

राज्यात शुक्रवारी ९०२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ६६ लाख ४७ हजार ८४० झाली आहे. सध्या राज्यात ६,९०३ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर दिवसभरात ६८० जणांची रुग्णालयातून सुटका झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६४ लाख ९५ हजार ९२९ झाली आहे. मुंबईत शुक्रवारी २९५ जणांना कोरोनाची बाधा झाली. २२७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. तर, कोरोनामुळे शुक्रवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या