शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Omicron: ओमायक्रॉनचे संकट गडद; महाराष्ट्रात ८ तर देशात २१ रुग्ण आढळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 08:05 IST

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले सात बाधित, जयपूरमध्ये नऊ जणांना तर दिल्लीत एकाला लागण, देशात एकूण रुग्णसंख्या २१

पुणे/नवी दिल्ली/जयपूर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात  ७ बाधित आढळल्याने खळबळ उडाली. आळंदीत एका तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असून, त्याचे नेमके निदान झालेले नाही. ओमायक्रॉनबाधितांचीराज्यात एकूण संख्या ८ झाली आहे. राजस्थानातील जयपूर येथे नऊ तर राजधानी दिल्लीत एक असे दहा ओमायक्रॉनबाधित रविवारी आढळले. ओमायक्राॅनबाधितांची देशातील संख्या आता २१ झाली आहे. 

राज्यात डाेंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला बाधित आढळला. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ७ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. भारतीय वंशाची महिला २४ नोव्हेंबरला नायजेरियातून पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. सोबत तिच्या दोन मुलीही होत्या. या तिघींच्या संपर्कात आलेल्या १३ जणांची तपासणी केली असता महिलेचा भाऊ, दोन मुली अशा सहा जणांनाही लागण झाल्याचे उघड झाले. पुण्यातील ओमायक्राॅन बाधित फिनलँड येथून परतला हाेता. 

ब्रिटनमध्ये रुग्णसंख्येत पाचपट वाढब्रिटनमध्ये ओमायक्राॅन व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कालपर्यंत या विषाणूचा संसर्ग झालेले ३२ रुग्ण आढळून आले हाेते. आता हा आकडा एकाच दिवसात जवळपास पाच पटीने वाढून १६० वर गेला आहे. त्यावरून हा विषाणू किती वेगाने पसरताे, याचा अंदाज येऊ शकताे. अमेरिकेतही ओमायक्राॅनचे रुग्ण वाढून ८ झाले आहेत.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या