शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

Gold Rates: बाबो! सोन्याची नव्या विक्रमाकडे झेप; 1400 रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 04:38 IST

दलालांनी चांदीपेक्षा सोन्याकडे कल वाढविल्याने हा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे विदेशी बँकांनी व्याजदर घटविल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढल्याचे चित्र आहे.

जळगाव : सोन्याचे भाव वाढतच असून, बुधवारी त्यात १४०० रु पयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोने ५४ हजार ९०० रु पये प्रतितोळा होऊन ५५ हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. चांदीत मात्र १३०० रुपयांनी घसरण होऊन ती ६६ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली.

दलालांनी चांदीपेक्षा सोन्याकडे कल वाढविल्याने हा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे विदेशी बँकांनी व्याजदर घटविल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढल्याचे चित्र आहे.जुलैच्या पहिल्या आठवड्यात सोने ४९,२००वर होते. त्यानंतर २८ रोजी अडीच हजार रुपयांनी वाढ होऊन ते ५३ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. आज आणखी १४०० रुपयांची वाढ झाली. चांदीमध्येदेखील गेल्या अनेक दिवसांपासून वाढ सुरू आहे.

जागतिक पातळीवर सोन्याची खरेदी वाढतच असल्याने भाव सातत्याने वाढत आहे. मागणी जास्त व आवक कमी अशी स्थिती असल्याचा हा परिणाम आहे.- सुशील बाफना,सुवर्ण व्यावसायिक

टॅग्स :Goldसोनं