शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

शहरवासीयांसाठी आॅलिम्पिक दिवास्वप्नच

By admin | Updated: August 23, 2016 02:27 IST

सिडकोने क्रिकेट व गोल्फसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने उपलब्ध करून दिली आहेत.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- सिडकोने क्रिकेट व गोल्फसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. परंतु आॅलिम्पिकमध्ये सहभाग असणाऱ्या खेळांसाठी मैदान व आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकही मैदान व प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नाही. खेळाच्या नावाखाली क्लबचे स्तोम वाढविण्यावर भर दिला आहे. कुस्तीपासून इतर खेळांना दुय्यम स्थान दिल्यामुळे सुनियोजित शहरासाठीही आॅलिम्पिक पदक दिवास्वप्नच ठरत आहे. नवी मुंबईची रचना करताना प्रत्येक सेक्टरमध्ये मैदान उपलब्ध करून देण्याचे धोरण निश्चित केले होते. महापालिका व खाजगी शाळांनाही स्वतंत्र मैदान उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक नोडमध्ये स्पोर्ट क्लब व विविध क्रीडा संघटनांसाठी भूखंड आरक्षित केले आहेत. परंतु प्रत्यक्षात या मैदानांचा वापर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी होत नाही. शहरामध्ये कुस्तीची आवड असणारे हजारो नागरिक आहेत. कृष्णा रासकर, वैभव रासकर यांच्यापासून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेले खेळाडू शहरात वास्तव्य करत आहेत. २० वर्षे महापालिका व सिडकोकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीकेंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. परंतु सिडको व महापालिकेने आश्वासनांशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. ट्रक टर्मिनलजवळ मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड टाकून कुस्तीगीर सराव करत आहेत. नेरूळ सेक्टर ६ मध्ये बापू उणावणे यांनी सम्राट क्रीडा अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. परंतू सिडकोने त्यांना सक्तीने भूखंड मोकळा करण्यास भाग पाडले. मैदानच नसल्याने राज्यपातळीवर चमक दाखविलेले ५० पेक्षा जास्त मल्लांना अर्ध्यावरतीच खेळ सोडावा लागला आहे. जीममध्ये जावून पिळदार शरीर बनविणे व मैदानावर क्रिकेट खेळणे याव्यतिरिक्त कोणत्याही खेळांना प्राधान्य दिले जात नाही. सिडकोने अनेक क्रीडा संघटनांना भूखंडांचे वितरण केले आहे. परंतू या संघटनांना चांगले खेळाडू घडविण्यात अपयश आले आहे. नवी मुंबईमधील खेळ हा शालेय स्पर्धांपुरताच मर्यादित राहिला आहे. राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यास दहावीच्या परीक्षेत जादा दहा गुण मिळतात म्हणूनच खेळांमध्ये सहभाग घेतला जातो. आॅलिम्पिकमध्ये ज्या खेळांचा सहभाग आहे त्यांचे प्रशिक्षण देणारे एकही केंद्र नवी मुंबईमध्ये नाही. शहरामध्ये वर्षभर ५ ते ६ मॅरेथॉन स्पर्धा होतात. परंतू त्या स्पर्धांमध्ये गांभीर्य नसते. इव्हेंटचे स्वरूप दिले जात असून त्यामधून खेळाडू घडण्यासाठीचे प्रयत्नच होत नाहीत. महापालिकेच्या सर्व मैदानांची दुरवस्था झाली आहे. शाळांनी त्यांच्या ताब्यातील मैदानांना टाळे लावले आहेत. अनेक ठिकाणी मैदानांचा वापर वाहनतळ म्हणून केला जात आहे. झोपडपट्टीतील नागरिकांसाठी मैदानाचा भूखंड नाही. खेळाडूंसाठी मैदाने व प्रशिक्षणाची सुविधा नसताना आॅलिंपिक विजेते खेळाडू कसे तयार होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. >सिडको कुस्तीसाठी भूखंड देत नाही व महापालिकेच्या आखाड्याला मुहूर्त मिळेना झाला. यामुळे ट्रक टर्मिनलजवळ पत्र्याचे शेडमध्ये आखाडा सुरू आहे. ५० खेळाडू येथे प्रशिक्षण घेत आहेत. आर. के. शिरगावकर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खेळाडू कृष्णा रासकर, प्रशिक्षक दत्तात्रय दुबे यांनी आखाडा सुरू ठेवलाय.>क्रिकेटचे मैदान धूळखात सिडकोने डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट अ‍ॅकॅडमीला १२ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी नेरूळमध्ये एक लाख चौरस मीटरचा भूखंड दिला. विजय पाटील यांनी तेथे भव्य स्टेडीयम उभारले. परंतु अद्याप त्या मैदानामध्ये एकही आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅच होवू शकली नाही. २०१९ मध्ये युवा फुटबॉल विश्वचषक होणार असला तरी या मैदानाचा खेळाडू घडविण्यासाठी फारसा उपयोग झाला नाही.