शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

जुन्या नोटांच्या बाजारात कापसाला ५२०० भाव

By admin | Updated: November 17, 2016 16:32 IST

पाचशे व हजाराच्या प्रतिबंधित नोटांच्या बाजारात वस्तूंचे दर दुप्पट होत असताना कापूस बाजारात मात्र जुन्या नोटा घेतल्यास प्रति क्विंटलला तब्बल पाच हजार २०० रुपये भाव दिला जात आहे

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 17 : पाचशे व हजाराच्या प्रतिबंधित नोटांच्या बाजारात वस्तूंचे दर दुप्पट होत असताना कापूस बाजारात मात्र जुन्या नोटा घेतल्यास प्रति क्विंटलला तब्बल पाच हजार २०० रुपये भाव दिला जात आहे. तर नव्या नोटांसाठी हा भाव केवळ ३८०० रुपये प्रति क्विंटल ठेवण्यात आला आहे.

पाचशे व हजारांच्या नोटा बंदीचा परिणाम कापूस बाजारावर पहायला मिळत आहे. ८ नोव्हेंबरपासून चलनी नोटांच्या अडचणीमुळे कापूस बाजारातील उलाढाल जणू थंडावली आहे. सध्या प्रति क्ंिवटल ४५०० ते ४८०० भाव आहे. प्रत्यक्षात सरासरी ४५०० रुपये भाव कापसाला दिला जात आहे. नोटा बंदीमुळे त्यात २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. मात्र जुन्या नोटा चलनात आणण्यासाठी दरवाढीची शक्कल लढविली जात आहे. जुन्या नोटा घेण्याची तयारी असेल तर सरासरी भावापेक्षा ७०० ते ८०० रुपये अधिक दिले जात आहे. जुन्या नोटा घेणाऱ्यांच्या कापसाला प्रति क्ंिवटल ५२०० रूपये एवढा भाव दिला जात आहे. परंतू जुन्या नोटा घेऊन ठेवायच्या कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीही कॅश

शेतकऱ्यांना देण्यासाठी नोटाच नसल्याने कापसाची खरेदी थंडावली आहे. याचाच फायदा घेऊन काही व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव हमीभावा पेक्षाही पाडले आहेत. दैनंदिन खर्चासाठी शेतकऱ्याला पैशाची नितांत गरज आहे. ही अडचण ओळखून अनेक व्यापारी प्रति क्ंिवटल अवघा ३८०० रुपये भाव कापसाला देत आहे. या मोबदल्यात नव्या नोटा दिल्या जात आहेत, एवढेच. खर्चासाठी पैसाच नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने या पडलेल्या भावात कापूस विकावा लागत आहे.

जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैसे घेणे, देणे हे सर्वच व्यवहार बंद झाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रामीण भागात शेतकरी जिल्हा सहकारी बँकांवरच पूर्णत: अवलंबून आहे. मात्र या बँकेचे व्यवहारच थांबल्याने अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेने सुरुवातीला तीन दिवसात ६० कोटी रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात स्वीकारले. मात्र बँकेच्या या नोटा स्वीकारण्यास स्टेट बँकेने नकार दिल्याने जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहे. याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे. - सुवर्ण बाजारात सर्वाधिक गुंतवणूक ८ नोव्हेंबरला नोटा बंदी लागू झाल्यानंतर रात्रीतून सराफा बाजारात मोठी उलाढाल झाली. सोन्याचा दर प्रति तोळा ३२ हजार रुपये असताना त्याच रात्री तो सहा हजाराने वाढून ३८ हजारांवर गेला. दुसऱ्या दिवशी हा दर ४२ हजार तर नंतरच्या दोन दिवसात तो ४५ ते ४८ हजारांवर गेला. प्रत्येक तोळ्यावर १४ ते १५ हजारांची मार्जीन ठेऊन जुन्या नोटांमध्ये सोन्याची बुकींग केली गेली. महिना-दोन महिन्याने या सोन्याची डिलीव्हरी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. जिल्ह्यात अशा सोन्याचा बुकींगचा आकडा २०० किलोवर गेल्याची चर्चा सुवर्णबाजारातून ऐकायला मिळत आहे. सोन्या पाठोपाठ आता कापसाच्या बाजारातही जुन्या नोटा ह्यमार्गीह्ण लावण्यासाठी ह्यउलाढालह्ण होत आहे.