पुणे : भरधाव वाहनाची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात ६२ वर्षीय ज्येष्ठाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज घाटामध्ये घडला. वसंतराव काळुराम मोरे (वय ६२, रा. राजापूर, ता. भोर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंतराव मोरे आणि त्यांची नात मोटारसायकलवरून जात होते. त्या वेळी अज्ञात वाहनाची त्यांना धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वसंतराव मोरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची नात श्रावणी तुषार मोरे किरकोळ जखमी झाली. अपघातानंतर वाहनासह चालक पसार झाला. मुलगा पोलीस कर्मचारी तुषार मोरे यांनी फिर्याद दिली आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेने ज्येष्ठ ठार
By admin | Updated: April 30, 2016 01:40 IST