शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या कर्जमाफीचा एकही कागद सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 03:01 IST

आघाडी सरकारच्या काळात २००८, २००९ मध्ये देण्यात आलेल्या कर्जमाफीचा काही रेकॉर्डच सापडत नसल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला

विशेष प्रतिनिधी मुंबई : आघाडी सरकारच्या काळात २००८, २००९ मध्ये देण्यात आलेल्या कर्जमाफीचा काही रेकॉर्डच सापडत नसल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला. शेतकºयांच्या नावाखाली उद्योग, बिल्डर यांची कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी केल्याचे धक्कादायक प्रकार त्या वेळी घडले, असा आरोप करत या वेळी काहीही होऊ नये म्हणूनच शेतकºयांचे आॅनलाइन आणि आॅफलाइनही २६ हजार अर्ज आपले सरकार केंद्रांवर भरून घेण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.कर्जमाफीवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमत्री म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात वाहत्या गंगेत अनेकांनी हात धुऊन घेतले. त्यात बँकादेखील होत्या. विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना २८६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली तर मुंबईत २०८ कोटींची कर्जमाफी देण्यात आली. राज्यस्तरीय बँकिंग समितीने शेतकºयांची नावे सरकारकडे पाठविली आणि शहानिशा न करता कर्जमाफी देण्यात आल्याने एकेकाची ६०-६० लाखांची कर्जे माफ करण्यात आली. हे सगळे गैरप्रकार टाळावेत म्हणून प्रत्येक शेतकºयाकडून साधा सुटसुटीत अर्ज भरून घेत आहोत.शेतकरी कर्जमाफीच्या योजनेची योग्य अंमलबजावणी होते की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्ष सदस्यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.कर्जमाफी हा शेतकºयांच्या समस्येवरील अंतिम उपाय नाही. स्वामीनाथन यांचेही तेच म्हणणे आहे. याच उपायावर सरकार थांबले तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतील. म्हणून कर्ज फेडण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. संस्थात्मक कर्जरचनेतून बाहेर गेलेल्या शेतकºयाला त्यारचनेत परत आणणे हा कर्जमाफीचा मुख्य उद्देश आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की, आघाडी सरकारने २००९ मध्ये ४ हजार कोटींची कर्जमाफी दिली. त्याच्या प्रसिद्धीसाठी १ कोटी ६० लाख रुपये खर्च केले. आम्ही ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिली अन् आतापर्यंत प्रसिद्धीवर ३६ लाख रुपयेच खर्च केले. खरंखोटं माहिती नाही पण वर्षपूर्तीनिमित्त केजरीवाल यांनी जाहिरातींवर ४०० कोटी रुपये खर्च केले होते.दहा हजार रुपयांच्या कर्जमाफीबाबत काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी अजिबात सहकार्य केले नाही. त्यात अमरावती जिल्हा बँकही एक आहे. अशांचे भविष्यात काय करायचे ते बघू, असा दमही मुख्यमंत्र्यांनी दिला. दहा हजारांच्या कर्जासाठी कोणताही बाँड शेतकºयांकडून मागण्यात आलेला नाही. साधा अर्ज करायचा आहे. एखादी बँक बाँड मागत असेल तर नाव सांगा, त्यांना सरळ करू, असा इशाराही त्यांनी दिला.