शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

‘आनंदाचा शिधा’मधील तेल निकृष्ट, डाळीत किडे, तर रव्यात..., सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 00:04 IST

Supriya Sule : सरकारकडून देण्यात येत असलेल्या आनंदाचा शिधामधील अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामधील तेल निकृष्ट आणि डाळी किडलेल्या आहेत, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

राज्यातील गोरगरिबांना सणासुदीच्या काळात गोडधोड करता यावं यासाठी राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा या माध्यमातून काही अन्नपदार्थांचं वाटप अवध्या १०० रुपयांमध्ये करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दिवाळीमध्ये सरकारने ‘आनंदाचा शिधा’वाटप केलं आहे. मात्र सरकारकडून देण्यात येत असलेल्या आनंदाचा शिधामधील अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामधील तेल निकृष्ट आणि डाळी किडलेल्या आहेत, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

सुप्रिया सुळे यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली असून, त्यात त्या म्हणाल्या की, गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिला गेलेला 'आनंदाचा शिधा' हा खाण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटण्यात आले.‌ हि गोरगरीब जनतेची शासनाने केलेली क्रूर अशी थट्टा आहे. गोरगरीबांच्या दिवाळीची अशी थट्टा करणाऱ्या शासनाचा तीव्र निषेध, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. 

दरम्यान, आनंदाचा शिधाच्या माध्यमातून पुरवण्यात येत असलेल्या अनपदार्थांच्या पाकिटावरील छापील वजनापेक्षा त्यातील अन्नपदार्थांचं वजन कमी असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार