शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अरे, उमेदवारच सापडेना !

By admin | Updated: January 19, 2017 03:14 IST

राजकीय पक्षाचा कार्यक्रम म्हटले की, प्रभागात कार्यकर्त्यांची फौजच्या फौज उभी राहते.

पूजा दामले,

मुंबई- राजकीय पक्षाचा कार्यक्रम म्हटले की, प्रभागात कार्यकर्त्यांची फौजच्या फौज उभी राहते. आमच्याकडे कार्यकर्त्यांची कमतरता नाही म्हणून मिरवणाऱ्या राजकीय पक्षांसमोरही आता महिला उमेदवार शोधण्यासाठी पळापळ करण्याची वेळ आली आहे. कारण नव्या आरक्षण सोडतीत चर्नीरोड पूर्वेकडील ‘सी’ वार्डातील प्रभाग २२२ हा इतर मागासवर्गीय महिला झाल्याने निवडणुकीच्या रिंगणात कोणता चेहरा मतदारांसमोर आणायचा यावरून राजकीय पक्षांची तारांबळ उडाली आहे.गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये २१८ प्रभागात येणारा काही भाग आता प्रभाग २२२मध्ये गेला आहे. त्यामुळे या विभागात सर्वच पक्षांना आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. गेल्या वेळेस खुला असणारा हा प्रभाग आता इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित झाला आहे. कार्यकर्त्यांची जुळवाजुळव आणि नव्याने पडलेले आरक्षण यामुळे आगामी निवडणुकीत कोणता उमेदवार रिंगणात उतरवायचा? हा यक्षप्रश्न सर्व पक्षांना पडला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे. शिवसेनेकडे संभाव्य उमेदवार म्हणून महिला पदाधिकारी, माजी नगरसेविका आहेत; पण अजूनही शिवसेनेकडून कोणत्या उमेदवाराला उभे करायचे याविषयी विचार सुरू आहेत. माजी नगरसेविकेबरोबर अजून एका महिला उमेदवाराचे नाव सध्या चर्चेत आहे; पण नक्की कोणत्या महिलेला कौल मिळेल याचे कोडे अद्याप सुटले नाही. काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भारतीय जनता पक्ष (भाजपा) या पक्षांमध्ये महिला कार्यकर्त्यांचीही कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या महिला नातेवाइकांची वर्णी लागावी म्हणून लगबग सुरू आहे. भाजपामधूनही दोन ते तीन नावांची चर्चा सुरू आहे; पण एका महिला उमेदवारावर आमदाराचा वरदहस्त असल्याने त्या महिलेची वर्णी लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काँग्रेसकडून तीन, तर सेवा दलातून एक महिला उमेदवाराचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची बहीण, पत्नी यांची नावे चर्चेत आहेत, तर मनसेकडून एका कार्यकर्त्याच्या पत्नीचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. >नव्या चेहऱ्याला नकारया प्रभागात मराठी आणि गुजराती भाषिक आहेत. त्यामुळे उमेदवार निवडताना याचाही विचार केला जात आहे. त्यामुळे उमेदवार निवड प्रक्रिया अधिकच क्लिष्ट होत चालली आहे. अनेक निकष लावताना जनसंपर्क किती? या निकषाचा विचार करणेही अपरिहार्य असल्याने राजकीय पक्षांची तारेवरची कसरत होत आहे. त्यामुळे नवीन महिला चेहरा आणण्यासाठी राजकीय पक्षांची तयारी दिसत नाही.