शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या चौकशीची याचिका फेटाळली

By admin | Updated: June 18, 2016 01:14 IST

मालेगाव बॉम्बस्फोट २००६, लोकल साखळी बॉम्बस्फोट २००६ आणि जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या तपास अधिकाऱ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी करावी, अशी

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट २००६, लोकल साखळी बॉम्बस्फोट २००६ आणि जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या तपास अधिकाऱ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. या तिन्ही केसेसचा अपील सर्वोच्च व उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने या टप्प्यावर आपण हस्तक्षेप करू इच्छित नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मोठमोठ्या बॉम्बस्फोट प्रकरणांत पोलीस ठरावीक एका समाजाच्या लोकांना अटक करतात. जबरदस्तीने त्यांच्याकडून कबुलीजबाब घेतात. मालेगाव २००६, लोकल साखळी बॉम्बस्फोट २००६ आणि जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपींकडूनही पोलिसांनी जबरदस्तीने कबुलीजबाब घेतला. न्यायालयापुढे खोटे साक्षीपुरावे सादर करून आरोपींना गुंतवण्याचा प्रयत्न केला. यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका आशिष खेतान यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. मालेगाव २००६ केसमध्ये विशेष न्यायालयाने आरोपींना आरोपमुक्त करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले का, अशी विचारणा गेल्या सुनावणीत खंडपीठाने राज्य सरकारकडे केली होती.शुक्रवारच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी मालेगाव २००६ बॉम्बस्फोटाप्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले असल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्याशिवाय लोकल साखळी बॉम्बस्फोट (७/११) प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तर जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, अशीही माहिती खंडपीठाला दिली.या सर्व केसेस सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयांपुढे प्रलंबित असल्याने आम्ही यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने खेतान यांची याचिका फेटाळली. (प्रतिनिधी)