शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

अनधिकृत पार्किंगमुळे ‘अधिकृत’ वाहतूक कोंडी

By admin | Updated: September 24, 2016 01:28 IST

हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या (एचआयए) पुढाकाराने मेट्रो जीप प्रकल्प सुरू केला.

वाकड : आयटीनगरी म्हणून ओळख असणाऱ्या हिंजवडीतील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या (एचआयए) पुढाकाराने मेट्रो जीप प्रकल्प सुरू केला. मात्र, या प्रकल्पाच्या बसगाड्यांना अधिकृत वाहनतळ नसल्याने ह्या बसगाड्या कुठेही अस्ताव्यस्त व अनधिकृतपणे उभ्या करण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. हिंजवडी उपनगरामध्ये आयटी कंपन्यांचे जाळे असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ अशा भागांमधून कामगार येत असतात. येथील रस्त्यांवरून दररोज अगणित वाहनांची ये-जा असते. त्यामुळे हिंजवडी परिसरात वाहतूककोंडी ही जटिल समस्या बनली आहे. या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून औद्योगिक विकास महामंडळ आणि एचआयए यांच्या संयुक्त विद्यमाने मेट्रो जीप ग्रीन आणि डिलाइट असा प्रकल्प हिंजवडीत राबविण्यात आला. या प्रकल्पाच्या ताफ्यात नुकतीच शंभरावी बसदेखील सामील झाली आहे. या प्रकल्पाद्वारे हजारो आयटी अभियंत्यांचा विनाअडथळा ये-जा करण्याचा प्रश्न तूर्तास काही प्रमाणात मिटला आहे. मात्र, ह्या बसगाड्यांसाठी अद्याप स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था नसल्याने ह्या बसगाड्या वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत आहेत. हिंजवडी फेज तीनसह आयटीनगरीच्या अन्य रस्त्यांवर ह्या बस वाहनचालक अस्ताव्यस्त उभ्या करत आहेत. हिंजवडी फेज तीन येथील मेगा पोलीस सर्कलला पीएममीचा थांबा आहे. मात्र, या थांब्यावर पीएमपीऐवजी मेट्रो जीपच्या बसगाड्यांनी अतिक्रमण केल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतुकीला तर अडथळा होतो. ह्या बसगाड्यांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. आयटी पार्कमधील वाहतूककोंडी फोडण्यासाठी रस्ते प्रशस्त झाले. मात्र, ह्या रस्त्यांचा सुमारे ४० टक्के भाग वाहनांच्या अनधिकृत पार्किं गनेच व्यापलेला असतो. त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी आहेत की पार्किंगसाठी, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर मुळशी शिवसेनेने आवाज उठविला असून, लवकरात लवकर स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दिवसेंदिवस आयटीनगरीत वाहनांच्या संख्या वाढत असताना पार्किंगची सोय नसल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर) >आयटी अभियंत्यांच्या सुविधेसाठी मेट्रो जीप हा प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र, ह्या बसगाड्यांसाठी अद्याप स्वतंत्र वाहनतळ नसल्याने त्या कुठे उभ्या कराव्यात, असा प्रश्न आहे. यावर आम्ही अभ्यास करीत आहोत. एमआयडीसीकडे आम्ही जागेची मागणी केली. त्यांनी एक जागादेखील सुचविली आहे. त्यावर कार्यवाही सुरू असून, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल.’’ - अनिल पटवर्धन, अध्यक्ष, एचआयए अभियंत्यांच्या सुविधेसाठी की गैरसोयीसाठी ह्या बसेस सुरू केल्या आहेत, याचा विचार एमआयडीसी आणि एचआयएने करावा. मात्र, सोय थोडी आणि गैरसोय जास्त, अशी परिस्थिती ह्या बसेसमुळे आयटीत निर्माण झाली आहे. आयटी अभियंत्यांसह सर्वांनाच या अस्ताव्यस्त बसेसचा त्रास होत असून, यावर कायमचा तोडगा काढावा. अन्यथा, आम्ही तीव्र आंदोलन करू.’’ -मच्छिंद्र ओझरकर, पुणे जिल्हाध्यक्ष युवा सेना