पारनेर (अहमदनगर) : निघोजचे माजी सरपंच, बाजार समितीचे माजी उपसभापती व युवक काँग्रेसचे पदाधिकारी संदीप वराळ यांच्या हत्येप्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, कॉस्टेबल भानुदास नवले, तुळशीदास वायकर, पोलीस नाईक संजय लोटे, पांडुरंग भांडवलकर यांना निलंबित करण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांची तडकाफडकी जिल्हा नियंत्रण कक्षात बदली झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ सौरभ त्रिपाठी यांनी ही कारवाई केली. वराळ यांच्या हत्येप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात १८ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी बबन कवाद, अमृता रसाळ, डॉ. महेंद्र झावरे यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतले. बाजार समितीचे माजी उपसभापती खंडू भुकन यांच्यासह काही जण फरार आहेत़ संदीप वराळ यांच्यावर शनिवारी दुपारी गोळ्या झाडण्यात आल्या़ हल्लेखोरांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला होता. (प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्याचा खून, पाच पोलीस निलंबित
By admin | Updated: January 23, 2017 04:04 IST