शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रॅकेट उद्ध्वस्त

By admin | Updated: June 2, 2017 04:07 IST

आयएएस, आयपीएससह बड्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देतो असे सांगून प्रचंड रकमा उकळणारे एक रॅकेट मुंबईच्या

यदु जोशी/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयएएस, आयपीएससह बड्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देतो असे सांगून प्रचंड रकमा उकळणारे एक रॅकेट मुंबईच्या क्राईम ब्रँचने उघडकीस आणले आहे. या रॅकेटमधील चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शासकीय दूध योजनेचा वरिष्ठ अधिकारी विद्यासागर हिरमुखे, पुणे येथील विशाल उंबळे, सोलापूर येथील राष्ट्रीय समाजवादी पार्टीचा पदाधिकारी म्हणविणारा किशोर माळी आणि नवी दिल्लीचा वीरेंद्रसिंग यादव यांचा समावेश आहे. पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हिरमुखे आणि इतर तिघांना विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये बुधवारी रात्री अटक करण्यात आली. मुंबई पोलीस दलाचे सहआयुक्त (गुन्हे) संजय सक्सेना यांनी या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनसुार, बदलीसाठी आपल्याकडे पैशांची मागणी करण्यात आल्याची तक्रार नामदेव चव्हाण यांनी गुन्हे शाखेकडे केली होती. अटक करण्यात आलेल्या हिरमुखे हा दूध योजनेत बडा अधिकारी आहे. आघाडी सरकारमधील एका राज्यमंत्र्यांचा तो नातेवाइक होता आणि पीएदेखील होता. मंत्रालयातील काही दलालांचा सहभागएवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अर्थातच मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध असतो. त्यामुळे या रॅकेटचा मुख्यमंत्री कार्यालयातील कोणत्या अधिकाऱ्याशी संबंध आहे काय? याचीही चौकशी केली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.धक्कादायक माहिती अशी आहे की,तक्रारीच्या आधारे कारवाई करताना प्रथमदर्शनी लहान वाटणाऱ्या या प्रकरणात बडे मासे गुंतलेले असल्याचे मानले जाते. या रॅकेटने आतापर्यंत काही अधिकाऱ्यांकडून बदल्यांसाठी काही कोटींच्या घरात रक्कम जमविली. अटक करण्यात आलेला माळी हा ‘सोलापूर कनेक्शन’ने बदल्या करवून घेत होता.हिरमुखे हा मंत्रालयातील काही दलालांना हाताशी धरत असे. त्यानंतर तो आणि हे दलाल बदलीसाठी इच्छुक असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आणि त्यांच्याकडून रकमेची मागणी करीत असत.