शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारी संचालक मनसेचा पदाधिकारी

By admin | Updated: June 6, 2014 01:03 IST

विशेष म्हणजे अत्याचारी दाभोळकर हा मनसेचा पदाधिकारी असल्याचे उघड झाले असून त्याने पुण्यात मनसेच्या तिकिटाखाली नगरसेवक पदाची निवडणूकही लढविली होती.

कजर्त बाल लैंगिक अत्याचार प्रकरण : दाभोळकर, तोंडेच्या पोलीस कोठडीत वाढ
अलिबाग : कर्जतमधील चंद्रभागा चॅरीटेबल ट्रस्टचा विश्वस्त आणि बेकायदा अनाथाश्रमाचा संचालक अजित चंद्रकांत दाभोळकर आणि त्याची साथीदार ललिता भगवान तोंडे यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपुष्टात आल्याने त्यांना येथील जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी त्यांना 9 जून र्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे अत्याचारी दाभोळकर हा मनसेचा पदाधिकारी असल्याचे उघड झाले असून त्याने पुण्यात मनसेच्या तिकिटाखाली नगरसेवक  पदाची निवडणूकही लढविली होती. 
या प्रकरणी पुण्यातील समाजसेवीका डॉ.अनुराधा सहस्त्रबुद्धे यांनी कजर्त पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर 27 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनाथाश्रमातील संगणकांची हार्डडिस्क पोलिसांनी ताब्यात घेतली असून तपास सुरू आहे.त्याचा अहवाल येणो बाकी आहे. या व्यतिरिक्त कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक उपकरणो देखील जप्त करण्यात आली आहेत. बाल लैगीक अत्याचार संरक्षण कायदय़ांतर्गत दाभोळकरवर गुन्हा दाखल केला आहे.  दाभोळकरने तयार केलेल्या अत्याचाराच्या फिल्म्सच्या सीडी  अद्याप मिळवणो बाकी आहे. 
चंद्रभागा चॅरीटेबल ट्रस्टचा संचालक अजित चंद्रकांत दाभोळकर हा 1995 मध्ये पुण्यातील डहाणूकर कॉलनी प्रभाग क्र.51 चा भाजपा प्रभाग अध्यक्ष होता. त्यानंतर त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. पुणो महानगर पालिकेच्या निवडणूकीत याच डहाणूकर कॉलनी प्रभागातून मनसेचा अधिकृत उमेदवार म्हणून त्याने निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार शाम देशपांडे यांनी दाभोळकरचा पराभव केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक अविनाश पाटील यांनी दिली आहे. दाभोळकर याच्याविरुद्ध मुंबईतील पायधुणी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा देखील दाखल असल्याचे पाटील यांनी सांगीतले. (विशेष प्रतिनिधी)
 
पीडित मुले हवालदिल
च्पिडीत मुला-मुलींचे जबाब कायद्यानुसार बालहक्क संरक्षण समिती समोर घेण्यात आले आहेत. तरिही पोलीस तपासाच्या निमीत्ताने या मुलांच्या घरी त्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता वारंवार जात असल्याने या मुलांचे कुटूंबिय हवालदिल झाल्याची तक्रार समाजसेविका डॉ.अनुराधा सहस्त्रबुद्धे यांनी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे.
च्ही मुले ज्या परिसरात राहतात तेथे या मुलांकडे पाहण्याचा अन्य लोकांचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. काही मुलांना अन्य मुले चिडवायला लागली आहेत. यांतून पिडीत अल्पवयीन मुला-मुलींच्या मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.