शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बेकायदा अटकेबद्दल भरपाई

By admin | Updated: June 21, 2015 01:33 IST

सुमारे ३२ तास बेकायदा डांबून ठेवून आणि सक्तीने वैद्यकीय चाचण्या घेऊन जालना जिल्ह्यातील अंबड पोलिसांनी नवी मुंबईतील ऐरोली येथील एका सिव्हिल इंजिनियर

मुंबई : सुमारे ३२ तास बेकायदा डांबून ठेवून आणि सक्तीने वैद्यकीय चाचण्या घेऊन जालना जिल्ह्यातील अंबड पोलिसांनी नवी मुंबईतील ऐरोली येथील एका सिव्हिल इंजिनियर तरुणाच्या सन्मानाने जगण्याच्या मुलभूत हक्काची पायमल्ली केल्याबद्दल राज्य सरकारने या तरुणास दोन लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.सेक्टर ४, ऐरोली येथे राहणाऱ्या सतीश वसंत साळवी या ३१ वर्षीय तरुणास सरकारने ही भरपाईची रक्कम आठ आठवड्यांत दिली नाही त्यावर १२ टक्के दराने व्याज द्यावे लागेल, असाही आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. श्रीमती इंदू जैन यांच्या खंडपीठाने दिला. याखेरीज साळवी यांना सरकारने दाव्याच्या खर्चापोटी २० हजार रुपये द्यावेत, असाही निर्देश न्यायालयाने दिला.साळवी यांना ज्यांनी बेकायदा अटक केली व ज्यांनी त्यांच्या सक्तीने वैद्यकीय चाचण्या करवून घेतल्या त्या अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन.वाय अंतराप यांच्यावर मोठ्या शिक्षेसाठी खातेनिहाय चौकशी करून सरकारने भरपाईची रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, असेही न्यायालयाने सांगितले.पूर्वी अंबड पोलीस ठाण्यात पाच वर्षे पोलीस निरीक्षक राहिलेले चंद्रकांत दिपक बळनागर यांच्या मुलीशी साळवी यांचा ३१ मे २०१३ रोजी विवाह झाला. जेमतेम अडीच महिने सासरी राहून वडील आजारी असल्याचे कारण सांगून साळवी यांची पत्नी माहेरी गेली. दोन महिन्यांनी येताना ती सोबत वडिलांना घेऊन आली. आई-वडिलांपासून वेगळे राहणार असशील तरच सोबत राहीन, अशी तिने अट घातली. साळवी यांनी यास असमर्थता दर्शविल्यावर ती माहेरी निघून गेली.माहेरी गेल्यावर तिनेअंबड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सात लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ करण्यासह इतर गुन्ह्यांची फिर्याद नोंदविली. त्यानंतर तीन आठवड्यांनी अंतराप ऐरोलीस आले व साळवी यांना अटक करून अंबडला घेऊन गेले. दंडाधिकाऱ्यांकडून रिमांड घेण्याआधी त्यांनी औरंगाबाद येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नेऊन साळवी यांची सक्तीने पौरुषत्व चाचणी करून घेतली.पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर आता राजकारणात सक्रिय असलेल्या सासऱ्याच्या दबावामुळेच अंतराप यांनी बेकायदा अटक व सक्तीने वैद्यकीय चाचण्या करून साळवी यांची समाजात बेअब्रु केली, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला. (विशेष प्रतिनिधी)काय म्हटले न्यायालयाने?-१३ एप्रिल २०१४ रोजी पहाटे तीन वाजल्यापासून ते १४ एप्रिलच्या साकळी ११ वाजेपर्यंत अंतराप यांनी दंडाधिकाऱ्यांकडून रीतसर रिमांड न घेता साळवी यांना बेकायदा डांबून ठेवले.-वस्तुत: साळवी यांच्यावर ज्या कथित गुन्ह्यांची फिर्याद त्यांच्या पत्नीने नोंदविली होती त्याचा त्यांच्या पौरुषत्वाशी काहीही संबंध नव्हता. तरीही अंतराप यांनी त्यांची त्यासाठी वैद्यकीय तपासणी करून घेतली. साळवी यांची मानसिक तपासणी करून घेण्याचाही त्यांचा इरादा होता. परंतु न्यायालयाच्या आदेशाशिवाय ती करण्यास इस्पितळाने नकार दिला.-या दोन्ही प्रकारे मुलभूत हक्कांची पायमल्ली झाल्याबद्दल प्रत्येकी एक लाख याप्रमाणे साळवी यांनी एकूण दोन लाख रुपये भरपाई.-याखेरीज स्वतंत्र भरपाईसाठी दिवाणी दावा करण्याचीही मुभा.