शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण नाही, तर निवडणुका नकोच! मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 09:44 IST

राजकीय पक्षांची आग्रही मागणी, ओबीसींना आरक्षण न देताच निवडणुका घेणे हा ओबीसींवरील मोठा अन्याय ठरेल, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

मुंबई : इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळत नाही तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही घेतली आहे.  राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत महाविकास आघाडी सरकार काय भूमिका घेते, याबाबत उत्सुकता आहे. 

ओबीसींना आरक्षण न देताच निवडणुका घेणे हा ओबीसींवरील मोठा अन्याय ठरेल, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी राज्याला वेळ लागणार आहे. कोरोनाचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे केंद्राची जनगणनादेखील होऊ शकली नाही. केंद्र सरकारकडे हा डाटा तयार आहे, तो त्यांनी राज्याला द्यावा यासाठी आमची न्यायालयीन लढाई सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच जागांवरील निवडणूक रद्द केली पाहिजे, अशी मागणी केली. 

सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे की, ओबीसींच्या आरक्षित जागा वगळून अन्य जागांवरील निवडणूक घेता येईल; पण न्यायालयाने ही निवडणूक घेतलीच पाहिजे असे काही म्हटलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या २७ टक्के जागा वगळून उर्वरित ७३ टक्के जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊ नये. अशा निर्णयामुळे केवळ सामाजिकच नाही तर गंभीर राजकीय पेच निर्माण होत आहे. आयोगाने सर्वच निवडणूक प्रक्रिया रद्द करावी. 

आरक्षणाचा गुंता फडणवीस सरकारमुळे वाढला! नाना पटोलेंची भाजपवर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, अशीच काँग्रेसची भूमिका आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. ओबीसी आरक्षणाचा गुंता देवेंद्र फडणवीस सरकारमुळे वाढला. आरक्षण संपविण्याचा भाजप व संघाचा अजेंडा आहे, अशी टीका पटोले यांनी केली. ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये अशी मागणी केली. यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्कीच चर्चा होईल, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून ओबीसी आरक्षण द्यावे, अशी मागणी ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन वाजूरकर यांनी केली. 

सरकारकडून आयोगाला अद्याप पत्र नाहीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात राज्य सरकारने मंगळवारी दिवसभर राज्य निवडणूक आयोगाशी कोणताही पत्रव्यवहार केला नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत राज्य सरकारची भूमिका ठरविली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण