शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी मंत्रालयाला ना आस्थापना ना अधिकार; मंत्री विजय वडेट्टीवार यांनीच मांडली व्यथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 05:52 IST

ओबीसी विभागाची परिस्थिती अशी आहे की जिल्ह्याजिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारीच या विभागाची कामे करतात, योजनांचे संचालन करतात. त्यांनी कामात काहीही कुचराई केली तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे ओबीसी विभागाला नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्या मंत्रालयाला स्वतंत्र आस्थापना नाही, सामाजिक न्याय विभागाकडून कर्मचारी उधार घेऊन कारभार करावा लागत आहे, अशी व्यथा बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी मांडली. ते पत्रकारांशी बोलत होते.वडेट्टीवार म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर मला आमचा विभाग चालवावा लागत आहे. केवळ मंत्रालयातच आमच्या विभागाची छोटी आस्थापना आहे, पण विभागीय, जिल्हा, तालुका पातळीवर काहीही नाही. माझ्या खात्याला पदे मंजूर केली, पण अद्याप भरलेली नाहीत. विनाअधिकारी, विनाकर्मचारी खाते कसे चालवायचे? पदे प्रत्यक्षात भरून द्या, अशी विनंती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.सूत्रांनी सांगितले की, ओबीसी विभागाची परिस्थिती अशी आहे की जिल्ह्याजिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारीच या विभागाची कामे करतात, योजनांचे संचालन करतात. त्यांनी कामात काहीही कुचराई केली तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे ओबीसी विभागाला नाहीत.

दोन्ही राजे एकत्र आल्याचा आनंद खा. उदयनराजे भोसले आणि खा. संभाजीराजे छत्रपती हे दोन राजे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एकत्र आले ही आनंदाची बाब आहे. ओबीसी समाजासाठीही त्यांनी असेच एकत्र यावे ही माझी विनंती आहे. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने संपुष्टात आले. ते पुन्हा बहाल करायचे तर राज्य शासनाने ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार