शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 15:33 IST

Laxman Hake Tauts Manoj Jarange Patil: मनोज जरांगेच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का, असा थेट सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

Laxman Hake Tauts Manoj Jarange Patil: आगामी विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसा राज्यात आरक्षणाचा वाद वाढताना पाहायला मिळत आहे. सगेसोयरे विषय तसेच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. तर ओबीसी आरक्षण वाचावे, यासाठी आंदोलन करत असलेले लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. काही ओबीसी आंदोलकांनी वडीगोद्री येथे उपोषणास सुरुवात केली आहे.  

एकीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असून, दुसरीकडे  मंगेश ससाणे आणि आंदोलकांचे सगेसोयरे अधिसूचना रद्द करावी, कुणबी दाखल्याद्वारे होत असलेली घुसखोरी थांबवावी या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. यातच आता लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना खोचक टोला लगावला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या

मनोज जरांगे प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी करत आहेत. जरांगेंना तुमच्या बिगबॉस मध्ये घ्या अशी माझी बिग बॉसच्या लोकांना मागणी आहे. यापेक्षा जरांगेंची कुठेही लायकी नाही, अशी बोचरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. जरांगेच्या बॅनरवर फुले शाहू आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का? असा सवालही त्यांनी केला. जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री जीआर काढतात याची लाज वाटते. हैदराबाद गॅझेट ,सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्याची शासनाची हालचाल सुरू आहे हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिला मुख्यमंत्र्याला कायदा कळतो का? असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

दरम्यान, जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून जीआर काढणार असाल तर ओबीसींचे जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. राहुल गांधी तुम्ही ओबीसीची भाषा बोलतात. पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस अंतरवाली सराटीला जाऊन आला, त्यांनी ओबीसींच्या भावना ऐकून घ्याव्यात, अशी टीका हाके यांनी केली. 

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण