शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

ओबीसींचा अनुशेष भरणार - वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 06:20 IST

खामगावात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आरक्षण बचाव महाअधिवेशन

खामगाव (बुलडाणा) : ओबीसींचे आरक्षण व पदोन्नतीचा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल. नोकरभरतीमध्ये ओबीसींचा अनुशेष भरून काढण्यास प्राधान्य राहील, ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्यासह मूलभूत समस्या सोडविण्यात येतील. तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृहे उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मदत व पुनर्वसन तथा ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.कोल्हटकर मंगल कार्यालयात रविवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव महाअधिवेशन पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष बबनराव तायवाडे हाेते. यावेळी माजी कामगार कल्याणमंत्री, आमदार डॉ. संजय कुटे, आ. अ‍ॅड. आकाश फुंडकर, आ. राजेश एकडे, माजी आमदार नारायण मुंडे, दिलीपकुमार सानंदा, राहुल बोंद्रे, काँग्रेस नेते श्याम उमाळकर, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल अमलकार, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी राणे, विठ्ठल लोखंडकार, दत्ता खरात उपस्थित होते.ओबीसी समाजबांधवांनी आपसातील वाद सोडून न्याय मिळविण्यासाठी एकजुटीने काम करावे, असा सल्ला यावेळी वडेट्टीवार यांनी दिला. बहुजनांवरील अन्याय सहन करणार नाही. ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी आपण स्वत:हून आग्रही भूमिका घेतली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला थोडाही धक्का लागू देणार नाही. येणाऱ्या काळात ३० हजार ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती योजनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ. माणूस, राजकीय नेता आणि मंत्री नव्हे, तर ओबीसींचा एक घटक म्हणून समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी लढणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.‘महाभरतीद्वारे १ लाख तरुणांना रोजगार द्या’राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष रमेश घोलप यांनी समाजाच्या समस्यांचे विवेचन केले. अध्यक्षीय भाषणातून तायवाडे यांनी संघटनेची भूमिका विशद केली. सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा. महाभरती करून १ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.  

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार