पावसाळी वातावरणात निसर्गाने ढगांच्या रुपातून अवघ्या कोकणावर पाण्याचा वर्षाव केला आणि अवघ्या कोकणानं हिरवा शालू पांघरला. खेड परिसरातील हे निसर्गसौंदर्य पाहताना जणू स्वर्गातच असल्याचा भास होतो. वर गर्द मेघ तर खाली हिरवा शालू पांघरलेली कोकणातील अवघी सृष्टी, हे सौंदर्य खरोखरंच मनाला मोहवून टाकते.
हे गर्द मेघ... :
By admin | Updated: July 8, 2017 22:15 IST