शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे पोषण आहार बंद, स्तनदा माता, कुपोषित बालकांना फटका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 04:53 IST

राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील २५०० अंगणवाडी केंद्रातील ८० हजारांपेक्षा अधिक बालकांसह सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार पुरवठा बंद आहे. त्याचा फटका अतिसंवेदनशील मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला बसणार आहे.

परतवाडा (अमरावती) : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील २५०० अंगणवाडी केंद्रातील ८० हजारांपेक्षा अधिक बालकांसह सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार पुरवठा बंद आहे. त्याचा फटका अतिसंवेदनशील मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला बसणार आहे.सोमवारपासून हा संप सुरू झाला. आदिवासी मुले नेहमीप्रमाणे केंद्रात हातात ताट घेऊन आले़ केंद्राला कुलूप पाहून परत गेली. धारणी व चिखलदरा तालुक्यात ४८२ अंगणवाडी केंद्र असून ३५ हजार मुले-मुली आहेत. पैकी २ हजारावर बालके ३ ते ६ वयोगटातील आहेत. त्यांना दररोज अंगणवाडी केंद्रातून मुगाची उसळ, तूर डाळ, तांदळाची खिचडी, अंडी दिली जातात. कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने शासनातर्फे आदिवासी बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. संप न मिटल्यास कुपोषित बालकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.सहा हजार मातांना फटका : गर्भवती आदिवासी तसेच स्तनदा मातांसाठी मेळघाटात ‘अमृत आहार योजना’ राबविली जाते. धारणी व चिखलदरा तालुक्यांत सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा माता आहेत. त्यांना या योजनेंतर्गत वरण, भात, भाजी, पोळी, अंडी, शेंगदाणा लाडू आदी आहार दिला जातो. सोमवारपासून हा पोष्टीक आहार बंद झाला आहे. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार