शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी वाहन खरेदीची संख्या घटली

By admin | Updated: November 4, 2016 02:22 IST

दिवाळीमध्ये दुचाकीसह चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या इतर वाहनांच्या खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली- दिवाळीमध्ये दुचाकीसह चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या इतर वाहनांच्या खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाची दिवाळी यंदा जोरात झाली नाही. दिवाळीमध्ये गेल्या वर्षी ९ कोटी ३६ लाख ६४ हजारांचा महसूल पनवेल आरटीओला प्राप्त झाला होता. मात्र यावेळी त्यामध्ये जवळपास सव्वा पाच कोटींची घट होवून ४ कोटी ८ लाख ३७ हजारांचा महसूल जमा झाला आहे. यावर्षी दिवाळीच्या सात दिवसांत पनवेल विभागात फक्त १५८० इतक्याच वाहनांची विक्री झाली. यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांचा समावेश आहे. यासर्व वाहनांच्या नोंदणीच्या माध्यमातून आरटीओला जवळपास चार कोटी आठ लाख रु पयांचा महसूल प्राप्त झाला. यासह आरटीओ विभागात विविध कर आणि कारवाईव्दारे कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दिवाळीच्या सणामध्ये शासनास सर्वाधिक महसूल प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्राप्त होतो. पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, उपप्रादेशिक अधिकारी अनंत पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांच्यासह आरटीओ अधिकाऱ्यांनी अतिरिक्त काम करत शासनास मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु यावर्षी वाहन खरेदीचे प्रमाण कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे. महागड्या गाड्यांकडे ग्राहकांची पाठस्थानिक प्रकल्पग्रस्तांना सिडकोकडून साडेबारा टक्के भूखंड प्राप्त झाले आहेत. त्यांची विक्र ी करून पूर्वी अनेकांनी महागड्या गाड्या खरेदी केल्या. मात्र सध्या रिअल इस्टेटला मंदी आहे, त्याचबरोबर खरेदी-विक्र ीचा व्यवहार होत नाही. या कारणाने भूखंडाला जास्त मागणी नसल्याने स्थानिकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे हातात पैसे नाही याच कारणाने यावर्षी महागड्या गाड्यांची खरेदी आणि नोंदणी झाली नाही.कमी किमती, त्याचबरोबर बजेटमधील दुचाकी व चारचाकी वाहनांचे खरेदीचे प्रमाणात बऱ्यापैकी होते. त्यातून आम्हाला चांगला महसूल मिळाला. परंतु मंदीचे सावट असल्याने जास्त किमतीच्या गाड्या ग्राहकांनी खरेदी केल्या नाहीत ही वस्तुस्थिती आढळून आली आहे. त्याशिवाय बाजारात चलन फिरते नसल्याचेही कारण आहे.- सुरेंद्र निकम, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी>09 कोटी ३६ लाख ६४ हजारांचा महसूल पनवेल आरटीओला प्राप्त झाला होता. मात्र यावेळी सव्वा पाच कोटींची घट होवून ४ कोटी ८ लाख ३७ हजारांचा महसूल जमा झाला आहे. 1580 इतक्याच वाहनांची पनवेलमध्ये विक्र ी झाली. यात दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांचा समावेश आहे. >वर्ष २०१५वाहनांचे प्रकारसंख्यामहसूलचारचाकी ६९६८७९२०७७४दुचाकी १२६८५७०५६९१एकूण १९६४९३६२६४६५>वर्ष २०१६वाहनांचे प्रकारसंख्या महसूलचारचाकी २७३२८५७६४१०दुचाकी ७४६४२८५३९१ट्रान्सपोर्ट ५६१७९७५९६४एकूण १५८०४०८३७७६५