शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अब की बार विदर्भ की सरकार

By admin | Updated: June 30, 2014 00:50 IST

विदर्भावर चर्चा खूप झाली. आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य झालेच पाहिजे. ‘अब की बार विदर्भ की सरकार’ असा नारा देत विदर्भवाद्यांनी रविवारी सायंकाळी

जनमंचचा पुढाकार : विदर्भवाद्यांनी घेतली शपथनागपूर : विदर्भावर चर्चा खूप झाली. आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य झालेच पाहिजे. ‘अब की बार विदर्भ की सरकार’ असा नारा देत विदर्भवाद्यांनी रविवारी सायंकाळी संविधान चौकात स्वतंत्र विदर्भासाठी लढण्याची जाहीर शपथ घेतली. ‘जनमंच’ या सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करण्यात आले. त्यानंतर जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी प्रस्ताविक केले. प्रा. शरद पाटील यांनी शपथेचे जाहीर वाचन केले. त्यांच्यासह उपस्थित विदर्भवाद्यांनीही शपथ घेतली. ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे यांनी भूमिका विषद करताना सांगितले की, विदर्भाच्या विषयावर बोलून खूप झाले आहे. आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. भाजपाने निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. ते आज सत्तेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे. लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुका झाल्यावर काही खरे नाही. त्यामुळे जे करायचे आहे, ते निवडणुकांपूर्वीच करणे आवश्यक आहे. विदर्भाची मागणी केवळ पुढाऱ्यांची मागणी असल्याचे सांगून या आंदोलनाची हेटाळणी केली जात होती. परंतु आम्ही अमरावती आणि नागपुरात जनमत घेतले. त्यात ८८ टक्के अमरावतीकरांनी आणि ९६ टक्के नागपूरकरांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे आता ही मागणी लोकांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ नेत्यांनीही घेतली शपथयावेळी विदर्भवाद्यांनी ‘हर-हर विदर्भ, घर-घर विदर्भ’ आणि ‘अब की बार विदर्भ की सरकार’ या घोषणांनी संविधान चौक दणाणून सोडला. यावेळी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही मार्गदर्शन करीत विदर्भासाठी लढण्याची शपथ घेतली. याप्रसंगी महापौर आ. प्रा. अनिल सोले, किशोर गजभिये, विदर्भ टॅक्सपेयर असोसिएशनचे अध्यक्ष जे.पी. शर्मा, तेजिंदरसिंह रेणू, विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ, दिनेश नायडू, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दीपक निलावार, वेदचे देवेंद्र पारेख, शिवकुमार राव, राहुल उपगल्लावार, जनमंचचे प्रमोद पांडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके, अ‍ॅड. फिरदौस मिर्झा, राम आखरे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रकाश इटणकर, किशोर गुल्हाणे, नरेश क्षीरसागर, प्रवीण महाजन, सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके आदी उपस्थित होते. अशी घेतली शपथ‘ मी शपथ घेतो की, विदर्भातील जनतेचे लाचारीचे जिणे संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने व सुखाने जगता यावे, याकरिता स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन. या प्रयत्नात पक्ष, धर्म, जात व इतर कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही’ अशी शपथ यावेळी घेण्यात आली. तसेच ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, वेगळ्या विदर्भ राज्यासाठी लावू पणाला प्राण... या गीताने विदर्भवाद्यांमध्ये उत्साह संचारला. (प्रतिनिधी)