शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

अबब! राज्यभरात ४४ हजार विद्यार्थ्यांनी महिनाभरापासून मारली शाळेला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 05:50 IST

विद्यार्थ्यांनी गेल्या महिनाभरात शाळेकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.

- अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पटसंख्येअभावी एकेक शाळा बंद पडत असताना शाळेतच न येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत शाळा गाफील आहेत. तब्बल ४४ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी गेल्या महिनाभरात शाळेकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. तर दुसरीकडे शिक्षण विभागाच्याचसरल प्रणालीमध्ये चक्क २ लाख ७५ हजार २८ विद्यार्थ्यांची नावे कोणत्याही शाळेच्या पटावर नोंदविली गेली नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. खुद्द विद्या प्राधिकरणानेच ही आकडेवारी जाहीर करत चिंता व्यक्त केली आहे.

ही आकडेवारी जाहीर करत विद्या प्राधिकरणाचे सहसंचालक राजेंद्र गोधने यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना ‘अलर्ट’ केले आहे. गोधने यांनी शिक्षणाधिकाºयांना पाठविलेल्या पत्रानुसार, पहिली ते बाराव्या वर्गात शिकणाºया २ लाख ७५ हजर २८ विद्यार्थ्यांची नावे सध्या कोणत्याही शाळेच्या पटावर अधिकृतरीत्या नोंदविलेली नाही. संबंधित शाळांनी हे पावणे तीन लाख विद्यार्थी सरल प्रणालीच्या ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकून ठेवले आहेत. तर दुसरीकडे ४४ हजार ६९८ विद्यार्थी गेल्या महिनाभरापासून शाळेतच आलेले नाहीत. हेपाहता राज्यात अद्यापही शाळाबाह्य मुलांची संख्या लाखाच्या घरात असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हानिहाय शाळाबाह्य विद्यार्थीअहमदनगर ५६५, अकोला ७२८, अमरावती ६१७, औरंगाबाद ६१०, बीड २५४७, भंडारा १२, बुलडाणा ४५१, चंद्रपूर १०७४, धुळे १८१७, गडचिरोली ९८, गोंदिया ११९, हिंगोली ७८४, जळगाव १८५६, जालना ९९२, कोल्हापूर २९६, लातूर ३२९, मुंबई ४६५५, नागपूर ३६, नांदेड १०५४, नंदूरबार २७५४, नाशिक ३४४९, उस्मानाबाद २२५, पालघर ४४१, परभणी २५००, पुणे ८९६८, रायगड ६४५, रत्नागिरी १०७, सांगली २००, सातारा ६६२, सिंधुदुर्ग २३७, सोलापूर ३१४, ठाणे ५०२८, वर्धा ४३, वाशिम ७५ तर यवतमाळ जिल्ह्यात ४१० असे राज्यात एकूण ४४,६९८ विद्यार्थी शाळाबाह्य आहेत. यात २३ हजार ८७३ मुली तर २० हजार ८२५ मुलांचा समावेश आहे.२२७० बालरक्षकांचीफौज काय करतेय?शाळाबाह्य मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी विद्या प्राधिकरणाच्या समता विभागाने राज्यात २२७० शिक्षकांना बालरक्षक म्हणून तयार केले आहे. त्यांना प्रशिक्षितही केले आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश शिक्षकांनी स्वत:हून ही जबाबदारी पत्करली आहे. आता याच बालरक्षकांचा सक्षमपणे वापर करून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्याचे निर्देश सहसंचालक राजेंद्र गोधने यांनी शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.