शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

आता तरी ‘दादागिरी’ थांबवा

By admin | Updated: January 20, 2017 00:17 IST

शहराचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायम तोडा आणि फोडाचे राजकारण केले.

पिंपरी चिंचवड : शहराचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायम तोडा आणि फोडाचे राजकारण केले. स्थानिक पातळीवर सातत्याने गटबाजीला प्रोत्साहन दिले. महापालिकेत दलालांना बसवून निष्ठावान कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले अनेक दिग्गज मोहरे पक्षाबाहेर गेले. ज्यांनी सगळ्यांसाठी खड्डे खोदले, त्यांनी आज स्वत:साठी मोठा खड्डा तयार करून घेतला. दलालांमुळे पक्षाची वाताहत झाली आहे, आता तरी दादागिरी थांबवा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता गुरूवारी केली. पिंपरी येथील पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाल्या, ‘‘शरद पवार यांच्या कार्यपद्धतीच्या प्रभावामुळे पुलोद आघाडी, एस काँग्रेस पुन्हा काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काम केले आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना गेल्या काही वर्षांपासून बाजूला ठेवले जात आहे. शहरातील नेतृत्त्वाची दादागिरी, प्रत्येक शब्दातून होणारी अवहेलना आणि सत्तेच्या नशेतून आलेल्या मुजोरीमुळे निष्ठावान कार्यकर्ते खरे बोलण्यासाठी घाबरत आहेत. शहराचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांनी दलालांचे ऐकून माझ्यावर सातत्याने अन्याय केला. परंतु, तरीही मी पक्ष सोडला नाही. स्वत:च्या हातात कायम सत्ता राहावी यासाठी स्थानिक पातळीवर एकमेकांमध्ये भांडणे लावली. त्यांच्यात एकी होऊ दिली नाही. त्यामुळे एकनिष्ठ असलेले आझम पानसरे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासारखे मोहरे पक्षातून गळून पडले. शहराचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्याने स्थानिकांसाठी खड्डे खोदले आणि त्यातून स्वत:साठी मोठा खड्डा तयार केला. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता गेली आणि या खड्ड्यातच मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न गाडले गेले, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)>हुकूमशाहीमुळे पक्ष कमकुवतशरद पवार यांनी लोकशाहीच्या तत्त्वावर उभारलेला पक्ष स्वत:च्याच घरातल्या लोकांनी हुकूमशाहीने कमकुवत केला. पक्षप्रमुखांनी डोळ्यांना झापडे बांधली की काय? असे दिसून येत आहे. चारित्र्य फक्त महिलांना नसते, तर पुरूषांनाही असते, हे नेते विसरले आहेत. या नेत्याच्या चारित्र्यावर बोलायचे म्हणजे अनेक दिवस कमी पडतील. नेते आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी, पिलावळांनी आणि दलालांनी चारित्र्याची भाषा केल्यास त्यांच्या चारित्र्याचा आलेख जनतेपुढे मांडला जाईल, असे सांगून दादा, आतातरी तुमची दादागिरी थांबवा, अशी टीका चव्हाण यांनी केली.