लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मे महिन्याची सुटी एन्जॉय करुन आता चिमुकली पावले पुन्हा एकदा शाळेकडे वळणार आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातील शाळा गुरुवार, १५ जूनपासून सुरू होणार आहेत. खासगी तसेच महापालिकांच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी शिक्षक, मुख्याध्यापकांनी केली आहे. एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यावर शाळांना उन्हाळ््याची सुटी सुरू झाली होती. त्यानंतर शाळेमध्ये शांतता होती. उद्यापासून पुन्हा एकदा शाळेची घंटा खणखणार असून शाळेत गजबज सुरू होईल. नवीन इयत्ता, नवीन युनिफॉर्म, नवीन पुस्तके यामुळे विद्यार्थी खूश आहेत.
...आजपासून शाळेची घंटा वाजणार
By admin | Updated: June 15, 2017 01:21 IST