शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

आता सेवानवृत्त शासकीय कर्मचार्‍यांनाही विमा छत्र!

By admin | Updated: August 10, 2014 20:56 IST

१ जुलै २0१४ नंतरच्या निंवृत्तीधारकांना मिळणार लाभ

वाशिम: शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांच्या सेवानवृत्तीनंतरही वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची सोय उपलब्ध करण्यासाठी, राज्य शासनाने वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा छत्र योजना आणली आहे. या योजनेंतर्गत कोणत्याही वैद्यकीय चाचणीविना अस्तित्वात असलेल्या आजारपणापासूनही संरक्षण अनुट्ठोय केले आहे.शासकीय कर्मचार्‍यांना वैद्यकीय खर्चाच्या परिपूर्तीची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे बहूतांश कर्मचारी वैद्यकीय विमा घेण्यासाठी इच्छूक नसतात. परिणामी सेवानवृत्तीनंतर नवृती वेतनाच्या र्मयादित स्त्रोतामधून आजारपणांवरील उपचाराचा वाढता खर्च भागविणे कर्मचार्‍यांना शक्य होत नाही. विमा कंपन्याही नव्याने वैद्यकीय विमा छत्र देत नाहीत. विमा छत्र दिले तरी त्यासाठी वैद्यकीय चाचणी आवश्यक असते आणि आधीपासून असलेल्या आजारांना विमा संरक्षणही मिळत नाही. या सर्व बाबींचा विचार करुन, शासनाने अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संघटना आणि विमा कंपन्यांदरम्यान वाटाघाटी घडवून आणल्या. त्यामध्ये विमा कंपन्यांनी संयुक्तरित्या गट वैद्यकीय विम्याचा प्रस्ताव समोर ठेवला. या प्रस्तावानुसार सेवानवृत्त कर्मचार्‍यांना वैद्यकीय चाचणीची गरज राहणार नसून, कर्मचार्‍यांना विमा घेतेवेळी अस्तित्वात असलेल्या आजारांसाठीही विमा छत्र मिळणार आहे. ही गटविमाछत्र योजना १ जूलै २0१४ ते ३0 जून २0१५ दरम्यान सेवानवृत्त होणार्‍या सर्व गट अ, ब, व क दर्जाच्या अधिकारी कर्मचार्‍यांसाठी सक्तीची राहणार आहे. ही गट विमा पॉलीसी एक वर्षासाठी म्हणजेच १ जूलै २0१४ ते ३0 जून २0१५ पर्यंत राहणार असून, तीन वर्षापर्यंत तिचे आपोआपच नुतनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पुढील प्रत्येक वर्षी १ जूलै ते ३0 जूनदरम्यान सेवानवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी आपोआपच या योजनेत सहभागी करुन घेतले जाणार आहेत. ३0 जून २0११ नंतर सेवानवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी या योजनेत आवश्यक तो वार्षिक हप्ता भरुन स्वेच्छेने सहभागी होऊ शकतील. ही योजना ह्यथर्ड पार्टी अँडमिनिस्ट्रेटरह्ण (टीपीए)मार्फत राबविण्यात येणार असून, राज्यातील १,२00 हून अधिक टीपीए अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयात, कॅशलेस पध्दतीने उपचार घेण्याची सोय या योजनेत राहणार आहे. या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संबंधीत कर्मचार्‍याला आगाऊ रक्कम भरावी लागणार नसून, रुग्णालयातील उपचाराचा खर्च अनुज्ञयतेप्रमाणे कॅशलेस पध्दतीने विमा कंपनीकडून थेट रुग्णालयास प्रदान केला जाणार आहे. यासोबतच अत्यंत तातडीच्या वेळी कोणत्याही रुग्णालयात उपचार करुन घेण्यासह त्या खर्चाची प्रतीपूर्ती अटीनुसार विमा कंपन्यांकडून केली जाण्याची सोयही विमाछत्र योजनेतून शासनाने सेवानवृत्त कर्मचार्‍यांना उपलब्ध करुन दिली आहे.