शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आता पालकांसह वाहनमालकांवरही होणार कारवाई

By admin | Updated: September 18, 2016 05:29 IST

वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना जीव गमवावा लागण्याच्या घटनेनंतरही पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे.

मुंबई : विनाहेल्मेट अल्पवयीन दुचाकीस्वाराला हटकल्यामुळे वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना जीव गमवावा लागण्याच्या घटनेनंतरही पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. याला आळा घालण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे. यात १८ वर्षांखालील मुले गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांसह मालकांनाही कोठडीची हवा खावी लागणार आहे. अशा प्रकरणांमध्ये एक हजार रुपये दंड किंवा तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत.विनापरवाना गाडी चालविणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. अल्पवयीन वाहनचालकांवर २०१५मध्ये ८ हजारांहून अधिक तर जुलै २०१६पर्यंत ६ हजारांहून अधिक कारवाईची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, ५० सीसी क्षमतेपेक्षा जास्त इंजिन असलेल्या वाहनांचा परवाना १८ वर्षांखालील मुलांना दिला जात नाही. तर सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक वाहन चालविण्यास २० वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मात्र तरीदेखील या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे होत आहे. खार परिसरात विनाहेल्मेट अल्पवयीन आरोपीला पकडले म्हणून दुचाकीस्वारासह त्याच्या भावाने विलास शिंदेंवर हल्ला चढविला. या हल्ल्यात शिंदेंचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला. परिवहन विभागाने केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार कारवाई सुरू करण्याचे आदेश राज्यभरातील प्रादेशिक विभागांना दिले आहेत. (प्रतिनिधी)>परिपत्रक जारीया आदेशामुळे अल्पवयीन चालकांच्या पालकांबरोबर वाहन मालकांनाही कोठडीची हवा खावी लागणार आहे. हे आदेश लागू करण्याचे परिपत्रक १४ सप्टेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे पाठविले असून, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.