शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

आता मनीआॅर्डरही होणार इतिहासजमा!

By admin | Updated: March 20, 2015 01:28 IST

आप्तस्वकीयांना पैशांसह ख्यालीखुशाली कळविण्याची व्यवस्था असलेली टपाल विभागाची मनीआॅर्डर सेवा बंद होणार असल्याचे संकेत केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहेत़

नीलेश शहाकार- बुलडाणादोन वर्षांपूर्वी टेलिग्राफचा कट्ट कडकट्ट आवाज थांबल्यानंतर आता आप्तस्वकीयांना पैशांसह ख्यालीखुशाली कळविण्याची व्यवस्था असलेली टपाल विभागाची मनीआॅर्डर सेवा बंद होणार असल्याचे संकेत केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहेत़ माहिती व तंत्रज्ञानाचा विकास झालेला नव्हता तेव्हा मनीआॅर्डर ही गावभागापासून ते शहरापर्यंत आप्तस्वकीयांना पैसे पाठविण्याची विश्वासार्ह व्यवस्था होती़ अनेक गावांत मनीआॅर्डर घेऊन येणाऱ्याची आतुरतेने वाट पाहिली जात असे़ अनेक बाया-बापुड्या पोस्टमनकडून मनीआॅर्डरच्या फॉर्मवर लिहून दिलेला खुशालीचा मजकूर वाचवून घेत असत़ नातेवाइकाच्या खुशालीचा निरोप ऐकल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून यायचे़ या व्यवस्थेवर अनेक पिढ्या पोसल्या, अनेकांचे भवितव्य घडले़ ती मग शिक्षणासाठी वडिलांनी मुलाला पाठविलेली, भावाने बहिणीला राखी पौर्णिमेची वा भाऊबिजेची पाठविलेली ओवाळणी असो अशा अनेक सण व उत्सवांमध्ये मनीआॅर्डरला तर सुगीचे दिवस असत़ आता अनेक सेवा लोकांना उपलब्ध झाल्या़ एटीएम, आॅनलाइन बँकिंगमुळे मनीआॅर्डर सेवेतून टपाल खात्याला महसूल मिळेनासा झाला. परिणामी, ही सेवा थांबविण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतला आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगातील स्पर्धेत टिकाव धरू न शकल्याने १०० वर्षांनंतर टेलिग्राफ सेवा बंद करण्यात आली़ तीच अवस्था मनीआॅर्डर सेवेची झाल्याचे दिसून येते़ जुने मनीआॅर्डर फॉर्म न विकण्याचे आदेश माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्यानुसार ६ फेबु्रवारीपासून जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये जुन्या मनीआॅर्डरची विक्री थांबविण्यात आली आहे. मनीआॅर्डर सेवा बंद करण्यासंदर्भात स्पष्ट आदेश नाही.- महम्मद ऐजाज शेख ईस्माईल, पोस्ट मास्तर, बुलडाणा डाक विभाग