शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
3
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
4
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
5
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
6
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
7
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
8
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
9
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
10
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
11
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
12
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
13
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
14
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
15
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
16
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
17
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
18
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
19
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
20
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

आता ग्रामीण विकासाची आदर्शाकडून स्मार्टकडे वाटचाल

By admin | Updated: March 19, 2016 02:08 IST

गावे आदर्श करणार असे सांगून ज्या योजना चालू होत्या त्यासाठी जो पैसा खर्च केला जात होता त्याचीच पुनरावृत्ती ‘स्मार्ट गाव’ नावाने करण्यात येणार आहे.

- वसंत भोसलेगावे आदर्श करणार असे सांगून ज्या योजना चालू होत्या त्यासाठी जो पैसा खर्च केला जात होता त्याचीच पुनरावृत्ती ‘स्मार्ट गाव’ नावाने करण्यात येणार आहे. इतकाच काय तो ग्रामविकास धोरणात बदल दिसतो आहे काय, हेदेखील स्पष्ट करण्यात आलेले नाही.महाराष्ट्र अर्थसंकल्पातील ग्रामविकासासाठी तरतुदी पाहिल्या की वाटते, मागील वर्षाच्या अर्थसंकल्पातील पानावरूनच हादेखील अर्थसंकल्प मांडला आहे. त्याच त्या योजना, त्याच कमी-अधिक तरतुदी आहेत. त्या सर्वांची बेरीज करून आकडे फुगवून सांगितले गेले आहेत. दुष्काळामुळे शेती अडचणीत आल्याचे लक्षात ठेवून काही तरतुदी केल्या आहेत, तेवढ्याच तरतुदी ग्रामविकासाला पूरक ठरतील अन्यथा आदर्श ग्राम योजनेचे नाव बदलून ‘स्मार्ट गाव’ जाहीर करण्याचा मनोदय हाच काही नवीन शोधलेला मार्ग दिसतो आहे. त्यामुळे ग्रामविकासाच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प म्हणजे आदर्श गावांऐवजी स्मार्ट गावे करण्याचा मनोदय आहे. मात्र, त्यासाठी नवीन धोरणात्मक एकही निर्णय नाही.रस्ते, पाणी, स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठबळ याव्यतिरिक्त काहीही नवीन नाही. जे रस्ते पंतप्रधान ग्रामसडक आणि मुख्यमंत्री सडक योजनेत नाहीत, त्यांच्या बांधणीसाठी पालकमंत्री सडक योजना आखली आहे. यातून केवळ पाणंद रस्ते होणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेसाठी २००० कोटी रुपयांची तरतूद स्वागतार्ह आहे. त्याद्वारे शेततळी, विहिरी आणि विद्युतपंप जोडणी करण्यात येणार आहे. शेतीसाठी ज्या तरतुदी आहेत, त्या ग्रामीण भागात होणार आहेत, म्हणून ग्रामविकासाला अर्थसंकल्पात थोडेसे स्थान आहे, असे म्हणता येईल. अन्यथा ग्रामविकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कोणतीही ठोस योजना या अर्थसंकल्पातून मांडण्यात आलेली नाही. सर्व जुन्याच योजना चालू ठेवण्यात येणार आहेत. त्याची माहिती जनतेला व्हावी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीत डिजिटल बोर्ड लावण्याचे ठरले आहे. संकल्पनाच नवी नाही, जुनीच नव्या बोर्डावर सांगण्यात येणार आहे.ग्रामीण आणि दुर्गम भागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी केवळ ५०० कोटी रुपयांची तरतूद आहे. राज्यातील जवळपास दहा टक्के गावे (म्हणजे २८००) दुर्गम भागात आहेत. त्यापैकी असंख्य गावांना पाण्याची सोय नाही. प्रादेशिक नळयोजना जुन्या झाल्या आहेत. गावांच्या शाश्वत विकासासाठी ‘स्मार्ट गाव’ योजना प्रस्तावित आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. मात्र, ते कसे होणार किंवा त्यासाठी कोणती योजना आहे, हे स्पष्ट केलेले नाही. आदर्श ग्राम योजना, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान किंवा तंटामुक्ती यासारख्या देशभर आदर्श मानल्या गेलेल्या योजनांचे भवितव्य काय, हेदेखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्याऐवजी ग्रामीण भागाच्या जलद विकासासाठी ग्रामपंचायती अधिक सक्षम करण्यात येणार आहेत, असे म्हटले आहे. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती, मातोश्री ग्रामपंचायत आणि महिला सक्षमीकरण अभियान या योजना मांडल्या आहेत. त्यासाठी आर्थिक तरतूद किंवा या योजनेतून कशाप्रकारे ग्रामपंचायती सक्षम होणार आहेत, हे स्पष्ट होत नाही. शिवाय ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत समित्या सक्षम करण्याचे कोणतेही उपाय सांगितलेले नाहीत. (लेखक कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत.)