शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता गुरुवारपासून मंत्र्यांना गावबंदी!

By admin | Updated: June 9, 2017 06:11 IST

दुसऱ्या टप्प्यात गुरुवारपासून (१५ जून) सर्व मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय सुकाणू समितीच्या नाशिक येथील परिषदेत घेण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कर्जमुक्ती आणि इतर मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारपासून (१५ जून) सर्व मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय सुकाणू समितीच्या नाशिक येथील परिषदेत घेण्यात आला. तसेच येत्या दोन दिवसांत सरकारने सरसकट कर्जमुक्तीचा निर्णय न घेतल्यास सोमवारी (१२ जून रोजी) सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांवर ठिय्या आंदोलन; १३ जून रोजी रेल्वे, रास्ता रोको आणि १३ जूननंतर मुंबईचे दाणापाणी बंद करण्याचा इशाराही देण्यात आला.शेतकरी संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समितीची राज्यव्यापी परिषद गुरुवारी नाशिक येथे घेण्यात आली. या बैठकीस खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, शेकापचे आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील, कॉ. अजित नवले, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्यासह राज्याच्या अनेक भागातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेपूर्वी सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. कर्जमुक्तीच्या प्रश्नावर सुकाणू समितीने सरकारबरोबर चर्चेची तयारी दर्शविली असून, त्यासाठी सरकारवर दबाव वाढविण्यासाठी गुरुवारपासून मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन वर्षांपूर्वी भाजपा सरकारसाठी गावोगावी जाऊन मते मागितल्याबद्दल आज पश्चात्ताप होत असल्याचे सांगून, शेतकरी संप फोडणाऱ्या गद्दाराला फार काळ पक्ष संघटनेत ठेवणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. त्यांचा रोख सदाभाऊ खोत यांच्यावर होता. तर ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी, सरकारने आम्ही सांगितल्याप्रमाणे कर्जमुक्ती दिल्यास राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, अशी हमी आपण लिहून देण्यास तयार असल्याचे सांगितले. मुंबईची रसद तोडली तर सरकार वठणीवर येईल, त्यासाठी रायगड व नाशिक जिल्ह्याने मुंबईचा पाणीपुरवठा बंद करण्याची तयारी करावी, असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले. शेतकरी आंदोलन राजकीय पक्षविरहित असल्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे सुकाणू समितीने आयोजित केलेल्या राज्यव्यापी परिषदेसाठी आलेले कॉँग्रेसचे आमदार भाई जगताप यांना व्यासपीठावर बसण्यास मज्जाव करण्यात आला. >आत्महत्यांचे सत्र सुरूचसरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. भोंडवेवाडी (ता. बारामती) येथील हनुमंत पांडुरंग शिंदे (वय ४८) व सिरसाळा (जि. बीड) भगवान बाबूराव पौळ (६५, रा. पौळपिंपरी) या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. सलग तिसऱ्या आत्महत्येने बारामती तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. तर कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या भोयगाव (चंद्रपूर) येथील महादेव कृष्णा मंदे या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीकडून भारतीय स्टेट बँकेने कर्ज वसुली केल्याची घटना पुढे आल्याने परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.मुनगंटीवारांची गाडी अडविलीअमरावती दौऱ्यावर आलेले वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांची गाडी अडवून कांदे फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.>मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फोडू शेतकऱ्यांना दरोडेखोर ठरवून सरकार त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करीत आहे. लाठीमार करून शेतकऱ्यांचे डोके फोडत आहे. शेतकऱ्यांवर असाच अन्याय होणार असेल तर आम्ही ‘वर्षा’वर बॉम्ब फोडू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. मुंबईच्या कथित सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी संयोजकांवरच तोंडसुख घेतल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना हुसकावून लावले. त्या भाजपाच्या हस्तक असल्याचा आरोप परिषदेत करण्यात आला. >आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कर्ज माफ ‘मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका,’ अशी चिठ्ठी लिहून वीट (ता. करमाळा) येथील धनाजी चंद्रकांत जाधव (वय ४५) या कर्जबाजारी शेतकऱ्याने बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. तसेच मुख्यमंत्री फडणवीस आल्याशिवाय जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. शेवटी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून कर्जमाफीचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.