ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 19 - वीजबिलांबाबत असलेल्या बहुतांश तक्रारी विजेच्या मीटरचे योग्य पद्धतीने रिडिंग न घेतल्याने निर्माण होत असतात. आता आता चुकीचे किंवा सरासरी मीटर रिडिंग घेण्याच्या पद्धतीला चाप बसणार आहे. मीटरचे रिडिंग घेण्यासाठी आता महावितरण मोबाईल अॅपचा वापर करणार आहे. या अॅपमुळे रिडिंग घेणाऱ्याला प्र्रत्यक्ष मीटरपर्यंत जाऊन फोटोसह रिडिंग घेतल्याशिवाय ते यंत्रणेत स्वीकारलेच जाणार नाही. या पद्धतीमुळे ग्राहकाला योग्य ते वीज बिल मिळेल व वीज बिलांबाबतच्या तक्रारीही कमी होतील. वीजपुरवठा खंडित होण्यासोबत ग्राहकांच्या वीज बिलांबाबत तक्रारी असतात. महावितरण कंपनीकडून मीटरचे रिडिंग घेण्याचे काम खासगी कंत्राटदारांना देण्यात आले आहे. सध्या प्रत्यक्ष मीटपर्यंत जाऊन त्याचा फोटो घ्यावा लागतो. हा फोटो वीज बिलावर छापण्यात येतो. बिलावर वीजवापराचा कालावधीही नमूद केलेला असतो. त्यामुळे फोटो पाहून ग्राहक वीज बिलाची पडताळणी करू शकतो. मात्र, या पद्धतीतही अनेक गडबडी होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा प्रत्यक्ष मीटरपर्यंत न जाताच अंदाजे, सरासरी मीटर रिडिंग टाकले जाते. काही वेळेला मीटरचा फोटोही चुकीचा येतो. याला आळा घालण्यासाठी यापुढे अॅपच्या माध्यमातूनच मीटर रिडिंग घेण्यात येणार आहे.
आता मोबाईल अॅपच्या माध्यमातून मीटर रिडिंग
By admin | Updated: July 19, 2016 21:38 IST