शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

आता महाभारत युतीधर्मावरून!

By admin | Updated: June 29, 2016 03:01 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना-भाजपामध्ये रंगलेले श्रेयाचे युद्ध आता युतीधर्म पाळण्याचा सल्ला देण्याच्या पातळीवर पोचले आहे.

अनिकेत घमंडी,

डोंबिवली- ठाकुर्ली उड्डाणपुलाचा फक्त प्रस्ताव मंजूर करण्यावरून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना-भाजपामध्ये रंगलेले श्रेयाचे युद्ध आता युतीधर्म पाळण्याचा सल्ला देण्याच्या पातळीवर पोचले आहे. आम्ही युतीधर्म पाळत होर्डिंगवर भाजपाचे नाव तरी घेतले, पण भाजपाने कुरघोडी करताना तेवढाही युतीधर्म पाळला नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे; तर आमच्या एकाही नेत्याचा फोटो होर्डिंगवर नसल्याने जनतेला पूर्णसत्य सांगण्यासाठी आम्हाला होर्डिंग लावावी लागली, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. मुंबईत शकुनीमामाचा वाद पेटलेला असतानाच कल्याण-डोंबिवलीत मात्र युतीधर्म पाळण्याच्या महाभारताचे वादळ घोंगावत होते. दोन्ही पक्षातील श्रेयाच्या चढाओढीची होर्डिंग शहरभर लागल्याची दखल घेत ‘लोकमत’ ने ‘सेना-भाजपमध्ये ‘शोले’ चा शो’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची प्रचंड चर्चा रंगली आणि दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांनी ‘शोले’ चा ‘शो’ वरुन आपसातील कुरबूर चव्हाट्यावर आणली. शिवसेनेचे नगरसेवक, महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोेरे म्हणाले, निदान आम्ही युतीचा धर्म पाळत होर्डिंगमध्ये भाजपाचे नाव तरी घेतले, भाजपने ते ही घेतले नाही. म्हणजे आम्ही युतीचा धर्म पाळला. त्याला प्रत्त्युत्तर देताना भाजपच्या पश्चिम मंडलाचे अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे म्हणाले, आधी बोर्ड शिवसनेनेच लावला, त्यात केवळ भाजपचे नाव घेतले. पण एकाही होर्डिंगमध्ये भाजपच्या नेत्याचा फोटो किंवा उल्लेख नव्हता. त्यामुळे भाजपने शिवसेनेची चूक सुधारत जनतेला पूर्णसत्य सांगण्यासाठी होर्डिंग लावले. त्यात चुकले कुठे? शिवसेनेनेच होर्डिंग लावतांना काळजी घेतली असती तर भाजपावर ही वेळच आली नसती. शिवसेनेने केवळ देखाव्यासाठी युतीचा धर्म पाळला का? असा टोलाही त्यांनी लगावला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत आणि सोशल मीडियावरही याच कुरघोडीची चर्चा सुरू आहे.