शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
2
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
3
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
4
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
5
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
6
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
7
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
8
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
9
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
10
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
11
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
12
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
13
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
14
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
16
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
17
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
18
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
19
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
20
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस

आता जमीन मोजणी होणार जलद; अत्याधुनिक रोव्हर्स येणार दिमतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:12 IST

१,७३२ कोटींचा निधी मंजूर, अधिकाऱ्यांसाठी नवी वाहने

 मुंबई : जमीन मोजणी अधिक जलद, आणि अचूक करण्यासाठी अत्याधुनिक रोव्हर्स खरेदी करण्याच्या, तसेच महसूल विभागाच्या नवीन कार्यालयीन इमारती व निवासस्थाने बांधण्यासाठी १,७३२ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात  बुधवारी झालेल्या बैठकीत, रोव्हर्स खरेदीसाठी १३२ कोटी आणि महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या बांधकामांसाठी १६०० कोटी रुपये मान्य झाल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

बैठकीला वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासाठी चांगल्या दर्जाची वाहने, तसेच वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि त्यांच्या पथकाला पोलिसांप्रमाणे शक्तिशाली वाहनांची गरज आहे.  पदानुसार उच्चप्रतीच्या गाड्या खरेदीसाठी एकच धोरण निश्चित करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.

ई-मोजणीसाठी आता थांबावे लागणार नाही...राज्यात ‘ई-मोजणी २.०’ प्रणालीमुळे जमीन मोजणी नकाशाची ‘क’ प्रत डिजिटल स्वरूपात नागरिकांना उपलब्ध होत आहे. या कामाला गती देण्यासाठी मनुष्यबळानुसार ४ हजार रोव्हर्सची आवश्यकता असून, पहिल्या टप्प्यात १२०० रोव्हर्स खरेदी केले जाणार आहेत. या निर्णयामुळे जमीन मोजणीच्या कामाला मोठी गती मिळणार आहे. पुण्यातील प्रलंबित नोंदणी भवनाचे कामही याच महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

नवीन कार्यालयांसाठी १६०० कोटींचा निधीभूमी अभिलेख कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच असावीत, जेणेकरून कामकाजात सुसूत्रता येईल, अशी सूचनाही बावनकुळे यांनी केली.

नवीन कार्यालयीन बांधकामांसाठी १५०० कोटी, तर भूमी अभिलेखच्या कार्यालयांसाठी १०० कोटी, अशा एकूण १६०० कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. तसेच, राज्याच्या भूमी अभिलेख विभागासाठी चांगल्या प्रतीचे १२०० रोव्हर्स खरेदी करण्यासाठी १३२ कोटींच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली. ही खरेदी प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

पाणंद रस्त्यांसाठी समग्र योजना सप्टेंबरपर्यंत राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तयार केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.या योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महसूल, ग्रामविकास आणि रोजगार हमी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अभ्यासगटासोबत तीन बैठका होतील, त्यानंतर सप्टेंबरअखेर अंतिम अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल. ही योजना यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी आमदार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांची असेल.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार