शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 08:47 IST

Mumbai News: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शासनाने नागपूर येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, महाराष्ट्र’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

मुंबई - राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शासनाने नागपूर येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, महाराष्ट्र’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ही संस्था पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे. राज्यातील आरोग्य क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणासाठी ती केंद्रबिंदू ठरणार आहे. या संस्थेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने १२० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

राज्यात बदलत्या सार्वजनिक आरोग्य गरजांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. ही संस्था शिक्षण, संशोधन, अंमलबजावणी सहाय्य, नियोजन, निरीक्षण आणि मूल्यमापन अशा विविध क्षेत्रांत आरोग्य विभागाला तांत्रिक पाठबळ देणार आहे. तसेच, नवीन प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याबरोबरच विद्यमान कर्मचाऱ्यांचे कौशल्यवर्धन आणि क्षमता विकास साधण्यावर भर दिला जाणार आहे.

या संस्थेसाठी नागपूर जिल्ह्यातील खापरी येथील  सुमारे ५.१ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संस्थेचे कामकाज कंपनी अधिनियमांतर्गत कलम ८ नुसार स्थापन होणाऱ्या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. या कंपनीमध्ये शासनाचे प्रतिनिधी, पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ तसेच सामाजिक क्षेत्रातील जाणकारांचा समावेश राहणार आहे. यामुळे संस्थेच्या कार्यात शैक्षणिक, तांत्रिक आणि सामाजिक समन्वय साधला जाणार आहे.

५० कोटींचा कॉर्पस फंड उपलब्ध करून देणारआर्थिक बाबींचा विचार करता, आरोग्य विभागाने या  प्रकल्पासाठी १२० कोटींचा भांडवली निधी तसेच  ५० कोटींचा कॉर्पस फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निधीच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा, संशोधन केंद्रे आणि प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यात येणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur to get Indian Institute of Public Health; ₹120 Crore Approved

Web Summary : Maharashtra approves an Indian Institute of Public Health in Nagpur with ₹120 crore funding. It will boost public health through education, research, and training, enhancing healthcare infrastructure and workforce skills. The institute will collaborate with the Public Health Foundation of India.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र