शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आता येणार फ्लार्इंग कार; निपाणीच्या उद्योजकाने केले मॉडेल विकसित

By admin | Updated: December 13, 2014 00:40 IST

आता येणार फ्लार्इंग कार; निपाणीच्या उद्योजकाने केले मॉडेल विकसित

राजेंद्र हजारे - निपाणी  येथील महेश महाजन या ५२ वर्षीय काजू लघू उद्योजकाने चक्क फ्लार्इंग कारचे मॉडेल बनविले आहे.चार व्यक्तींना घेऊन एक हजार ते बाराशे किलो वजनाची कार अंदाजे दहा लाख रुपयांत निर्माण करण्याचे स्वप्न वर्षभरातच पूर्ण होईल, असा विश्वास महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.महाजन यांना लहानपणापासूनच हवेत उडणारी खेळणी आणि पक्षी यांचे आकर्षण होते; परंतु एम. बी. ए.चे शिक्षण घेईपर्यंत त्यांनी याबाबत गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर विविध माध्यमातून हवेत उडणाऱ्या कारविषयी ऐकून त्यांनी अशी कार बनविण्याचे ठरविले आणि पत्नी सुरेखा, मुलगी वैष्णवी आणि मुलगा विवेक यांच्या सहकार्याने इंटरनेटच्या माध्यमातून माहिती संकलित केली.विमानाशी साधर्म्य असणाऱ्या या कारसाठी ए.व्ही.०८ बी. हरेर या विमानाची कन्सेप्ट डोक्यात ठेवून इंजिन, इलेक्ट्रॉनिक पार्ट, कंट्रोल बोर्ड आणि गॅस टर्बाईनचा वापर करून केवळ इंधन आणि स्वीचवर चालणारी कार बनविण्याचे ठरविले. २६ सप्टेंबर २०१२ ला चेन्नईला पहिल्या पेटंटसाठी अ‍ॅप्लिकेशन दिले होते.महाजन यांनी बनविलेले मॉडेल आठ किलो वजनाचे असून, बॅलन्ससाठी दहा छिद्रे त्याला बनविण्यात आली आहेत. बुस्टरमधून खेचलेली हवा या छिद्रांतून समानरीत्या बाहेर पडते. मॉडेलची उंची दीड फूट असून, घेर अडीच फुटांचा आहे. त्याला ०८ डक्टेक्ट फॅन बसविले असून, ५० हजार आर.पी.एम. (रोटेशन पर मिनिट) अशी या प्रत्येकी फॅन्सची क्षमता आहे. सध्या रिमोटवर या मॉडेलचे कंट्रोल होते. घरातील इतर कामे सांभाळत महाजन यांनी या कारसाठी इंटरनॅशनल पब्लिकेशन नंबर डब्ल्यू ओ २०१४/०४९६०७ मिळविला आहे.प्रत्यक्षात ही कार चार माणसांसह हजार ते बाराशे किलो वजनाची असेल. कारची १० बाय १० फूट रुंदी आणि ७ ते ८ फूट उंची असेल. विमान, हेलिकॉप्टरप्रमाणे याला मर्यादा नाही. वादळातही ही कार हवेतून धावू शकेल. एकाच जाग्यावरून थेट हवेत जाऊन पाहिजे तशी सरकवता येते. गल्ली-बोळात, अरुंद अडचणीच्या जागेत आणि अंडरग्राऊंड पार्किंगही या कारने सुलभर[त्या करता येते. चालक मध्यभागी तर बॅलन्ससाठी तीन प्रवासी बसण्याची व्यवस्था असेल, असेही महाजन यांनी सांगतले.१६० देशात पेटंट मागण्यास परवानगीदीड वर्ष खर्ची घालून बनविलेल्या या मॉडेलला चेन्नई पेटंट कार्यालयाने २६ सप्टेंबर २०१२ रोजी मान्यता देऊन त्यांच्याच माध्यमातून आंतरराष्ट्रीय सर्च रिपोर्ट दिला आहे. त्यांनी ‘एअर थर्स्ट व्हेईकल’ नावाने रजिस्ट्रेशन करून जगातील १६० देशांत पेटंट मागविण्यास परवानगी दिली आहे.