शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

आता पाय मोकळा करून घेतला - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 18, 2017 02:02 IST

भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आपण लोकांमध्ये जात आहोत, त्यामुळे या निवडणुकीत

अकोला : भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आपण लोकांमध्ये जात आहोत, त्यामुळे या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळेल, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे. आता पाय मोकळा करून घेतला आहे. तो पुन्हा अडकविण्याची वेळ येणार नाही, याची काळजी घ्या. तुम्ही मला मनपा द्या, मी तुम्हाला विकास, परिवर्तनाचा शब्द देतो, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे व महापौर उज्ज्वला देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, अजित पवार व राहुल गांधी यांचे पक्ष दिवाळखोरीत निघाल्याचे सांगतानाच भाजपा हा एक सक्षम पर्याय असल्याचे ते म्हणाले. या बँका परतावा तर देत नाहीच; मात्र मुद्दलही फस्त करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. मतदानरूपी डिपॉझिट भाजपाला दिले, तर पाच वर्षांत पाचपट विकासाचे व्याज देऊन मुद्दलही परत करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. भाजपा सरकारने दमदार कामगिरी करीत शहराच्या विकासाचा आलेख उंचावला असल्याचे ते म्हणाले. विदर्भातील महापालिकांपैकी नागपूरमध्ये विकासाची घोडदौड सुरू आहे; परंतु अकोला, अमरावती व चंद्रपूर या महापालिकांना अजूनही विकासाची आस आहे. या विदर्भाचा भूमिपूत्र आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. आतापर्यंत राज्याच्या एकाच भागाला निधी जात होता. आता तो अन्याय दूर करीत आहोत. राज्याच्या सर्वच भागांचा विकास झाला पाहिजे, यासाठी आपण कटिबद्ध आहोतच; परंतु आतापर्यंत ज्या भागाला विकास निधी देताना हात आखडता घेतल्या गेला, तेथे विकासाचा अधिक निधी जात असेल, तर कोणाच्या पोटात दुखता कामा नये, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.