शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छ १०० हॉटेलांना नोटिसा

By admin | Updated: July 23, 2016 02:21 IST

ठाणेकर आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याकरिता ज्या प्रतिथयश हॉटेलांमध्ये तेथील अ‍ॅम्बियन्स पाहून वरचेवर हजेरी लावतात

पंकज रोडेकर,

ठाणे- ठाणेकर आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याकरिता ज्या प्रतिथयश हॉटेलांमध्ये तेथील अ‍ॅम्बियन्स पाहून वरचेवर हजेरी लावतात, अशाबॉक्सएट, कोर्ट यार्ड, अ‍ॅम्बरोशिया, ब्ल्यू रूफ क्लब, कुं जविहार वडापाव, मंत्रा, चुल्हा, शिवप्रसाद, शिवसागर आणि समुद्रा या व अशा एकूण १०० हॉटेल, क्लबला कोकण विभाग अन्न व औषध प्रशासनाने स्वच्छतेचे निकष न पाळल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत. नवी मुंबईतील ‘बिकानेर’ आणि ‘महक’ या दोन व्यावसायिकांवर अस्वच्छतेमुळे खाद्यपदार्थ विक्रीची बंदी घातली आहे. ठाण्यासारख्या शहरात अ‍ॅम्बियन्स पाहून हॉटेल अथवा खाद्यपदार्थांच्या दुकानांमधून खरेदी करण्याकडे कल असतो. मात्र, जेथे खाद्यपदार्थ तयार केले जातात, तेथे स्वच्छतेच्या नियमांची खुलेआम पायमल्ली केली जाते. पावसाळ्यात विविध साथींच्या आजारांनी डोके वर काढलेले असताना अस्वच्छतेमुळे दूषित अन्नपदार्थांतून विषबाधा होण्याची भीती असते. ही बाब लक्षात घेऊनच कोकण विभाग अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल, क्लब आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांची तपासणी सुरू केली आहे. बहुतांश ठिकाणी स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याने नोटिसा बजावल्या आहेत. ठाणे शहर व नवीमुंबईतील किमान ६० टक्के हॉटेलांना, तर जिल्ह्यातील इतर ४० टक्के हॉटेलांना नोटिसा बजावल्या आहेत. >१०० व्यावसायिकांना कलम ३२ प्रमाणे सुधारण्याची संधी मिळावी म्हणून नोटिसा बजावल्या आहेत. त्रुटींची पूर्तता केल्याचे पुराव्यासह लेखी स्वरूपात निर्धारित मुदतीत सादर करायचे आहे. त्यानंतर पुन्हा विभागामार्फत त्या ठिकाणची पाहणी करण्यात येईल. नोटिसांची कार्यवाही करण्यापूर्वी व्हिडीओ शूटिंग केले असल्याने त्यांच्या अस्वच्छतेचे पुरावे उपलब्ध आहेत.- एस.एस. देशमुख, सहआयुक्त, अन्न प्रशासन विभाग (कोकण)