शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती मृत्यूप्रकरणी हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस

By admin | Updated: June 16, 2014 14:56 IST

पोलीस भरतीदरम्यान चार तरूणांचा मृत्यू झाल्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १६ - पोलीस भरतीदरम्यान चार तरूणांचा मृत्यू झाल्याची गंभीर दखल घेत  उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. येत्या सात दिवसांत या नोटीसीचे उत्तर देण्याचा आदेश न्यायालयाने दिला असून पुढील सुनावणी २३ जून रोजी होणार आहे.  
मुंबईत सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी आलेल्या शारिरीक चाचणीपरीक्षेदरम्यान आत्तापर्यंत चार तरूणांचा मृत्यू झाला आहे. राहुल सपकाळ,  अंबादास सोनावणे, साईप्रसाद माळी आणि विशाल केदारे या चौघांना धावण्याच्या चाचणी दरम्यान चक्कर आली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध नोंडवण्यात आला होता, तसेच  मुंबई पोलिस आणि राज्य सरकार विरोधात अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या चारही तरूणांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केली होती. तसेच यापुढे पोलिस भरतीदरम्यान पाच किलोमीटरचे अंतर तीन किमी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते. 
दरम्यान उच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणाची दखल  घेत उच्च 'स्यू मोटो' याचिका दाखल करुन घेतली. त्यावरील पुढील सुनावणी २३ जून रोजी होणार असून पोलीस दलासह राज्य सरकारलाही याप्रकरणी उत्तर द्यावे लागणार आहे.