पुणे : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाची बैठक गुरुवारी होत असून या बैठकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्यावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी देणारी नोटीस पोलिसांनी विद्यार्थ्यांना बजावली आहे. तर, विद्यार्थ्यांनी संस्थेच्या बाहेर शांततामय पद्धतीने आंदोलनाचे सूतोवाच केले आहे.एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान गजेंद्र चौहान यांच्यासह अनघा घैसास, नरेंद्र पाठक, राहुल सोलापूरकर या इतर सदस्यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तब्बल १३९ दिवस आंदोलनाचे शस्त्र उगारले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणाऱ्या बैठकीसाठी खबरदारी डेक्कन पोलिसांकडून विद्यार्थ्यांना नोटीस देण्यात आली आहे. दोन वर्षानंतर बैठक होत असल्याने तिच्या यशस्वितेसाठी एफटीआयआयच्या प्रशासनानेही कंबर कसली आहे. संस्थेच्या आवाराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना नोटीस
By admin | Updated: January 7, 2016 02:28 IST