शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नोटांचे टेन्शन अन् हास्याचा फुलबाजा!

By admin | Updated: November 9, 2016 02:57 IST

जेव्हा जेव्हा ९/११ ची तारीख येते तेव्हा सगळे हादरून जातात....या वर्षी कोणी लग्न करून नका....पाकिटात १०१ रूपयेच मिळतील..

पुणे : जेव्हा जेव्हा ९/११ ची तारीख येते तेव्हा सगळे हादरून जातात....या वर्षी कोणी लग्न करून नका....पाकिटात १०१ रूपयेच मिळतील...एटीएमच्या बाहेर रांगा...महापालिका निवडणुकांचा आता बाजार उठला...बीपी आणि हार्ट पेशंटच्या दवाखान्याबाहेर रांगा..आज ज्यांना झोप लागणार तो सर्वात श्रीमंत...फि लहाल जिनके पास काला धन नहीं है वे वॉटअपपर है, बाकी सब हिसाब लगा रहे हैं...उठा, उठा, दिवाळी आली...५००/१००० च्या नोटा बदलायची वेळ आली अशा अनेक पोस्टचा पाऊस वॉटसअप, व्टिटर, फेसबुकवर मंगळवारी रात्रभर पडत होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी भारतीय चलनातून ५०० व १००० रूपयांच्या नोटा बाद करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला. हा धक्का इतका मोठा होता कि सुरूवातीला या निर्णयावर काय प्रतिक्रिया द्यावी हे कुणालाही समजलेच नाही. काही वेळात सावरल्यानंतर मात्र सोशल मिडीयावर एका पाठोपाठ एक अशा हजारो पोस्ट पडायला सुरूवात झाली.सुरूवातीच्या पोस्टमध्ये या निर्णयाचे परिणाम काय होणार यावर चर्चा होती. सर्वसामान्यांना याचा त्रास होणार आहे. लोकांच्या एटीएम व पेट्रोल पंपाबाहेर रांगा लागल्या अशा पोस्ट येऊ लागल्या. भाजपा समर्थकांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन करायला सुरूवात केली. त्याचवेळी या निर्णयाने काहीच फरक पडणार नाही, नोकर-चाकरांच्या तसेच गरीबांच्या नावावर श्रीमंत लोक नोटा बदलून घेतील. त्यामुळे यातून फार काही निष्पन्न होणार नाही अशी निराशावादी भावनाही काहीजणांनी व्यक्त केली. या निर्णयाचा सर्वसामान्यांना कसा फटका बसणार आहे यावर चिंता व्यक्त करण्यात आल्या. व्हाटसअपच्या सर्व ग्रुपवर संकेदाला एक या वेगाने पोस्ट फिरत होत्या. या पोस्टमधून लोकांचा खूप गोंधळ उडालेला दिसत होता. सुरूवातीचा हा गोंधळ कमी झाल्यानंतर मात्र वॉटसअप, फेसबुक, व्टिटर या निर्णयावर जोक्स मोठयाप्रमाणात सुरूवात झाली. ‘‘जोपर्यंत दहाच्या नोटांवर बंदी येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही फरक पडत नाही....एक विनाअनुदानित शिक्षक’’, ‘अण्णा हजारे यांनी अधिकृतपणे आपले नाव बदलून ‘‘अण्णा शंभरे ’ केले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी’, ‘मोदींचे सर्जिकल स्ट्राइक...सगळे राजकारणी एका रात्रीत भिकारी’’, ‘‘म्हणूनच मी आधीच पळून गेलो हे मोदी अस काहीतरी करणार हे माहीत हुत.... विजय मल्ल्या’ ‘‘आज ज्यांना शांत झोप लागेल...ते खरे श्रीमंत’’ अशा एक से बढकर एक जोक्सचा पाऊस पडला.आता आहेर परत १०१ रुपयांवर येणारबिना खडग, बिना ढाल, बिना चाकू, बिना तलवार, काले धन को किया हलाल, पहली बार ऐसा होगा, जिसके पास पैसे हैमैं धारक को ५ सौ व १ हजार रूपये अदा करणे का वचन वापस लेता हँ : महात्मा गांधीआज रात जिस घर की लाइट जलती हुइ दिखे समझलो नोटो की गिनती चल रही हैंपंतप्रधानांकडे एवढे अधिकार असतात आजच कळंल : मनमोहन सिंगखुशखबर उद्यापासून ट्राफिक पोलीस गाडी पकडल्यानंतर शंभर रूपयेच मागतीलसगळया नोटांची चांदी काढून एक अंगठी बनवीन म्हणतोपुणेरी पाटी येथे ५०० व १००० रूपयांच्या नोटांचा कचरा टाकू नये टाकल्यास १०० रूपयांचा दंड करण्यात येईलअकेले मोदीने पुरे देश पे एक साथ इन्कम टॅक्स रेड डालीआज ज्यांना शांत झोप लागणार ते सर्वात श्रीमंतकाही मित्र तर उधार द्यायला फोन करीत आहेत. म्हणतात आरामात नंतर दे... काही घाई नाहीज्या गृहिणींनी नवऱ्यापासून नोटा लपवून ठेवल्या होत्या त्या नोटा पुन्हा बाहेर येणार. मोेदींनी केला त्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ज्यांना ज्यांना पैसे दिलते आधी ते फोन ऊचलत नव्हते. आता स्वत:हुन फोन करू राहीले..शेठ पैसे कुठ आणुन देऊ..?मोदीजी, की कृपा से जेब में जो ७० रुपये है उसपर ही कल का पुरा दिन गुजारना होगा !उठा उठा दीवाळी झाली५००/१००० च्या नोटा बदलायची वेळ आली ??अरे नोटा परत करण्यासाठी तरी सोडा येथे हजार पाचशेच्या नोटांची रद्दी घेतली जाईल.... ??अमेरिका मोजतोय व्होट, भारत मोजतोय नोट. निवडणुका तोंडावर आहेत. मतदारांना काय वाटणार? चेक की डेबिट कार्ड. १०० ची नोट म्हणाली, किसीको छोटा मत समजना...!आमच्याकडे ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा ९ रुपये प्रतिकिलोने स्वीकारल्या जातील. (रद्दीच्या दुकानाबाहेरील पाटी)