शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बहीण नव्हे, मुलीची हत्या !

By admin | Updated: August 27, 2015 05:46 IST

देशाच्या कॉर्पोरेट जगतातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या इंद्राणी मुखर्जीला (४५) ज्या तरुणीच्या हत्येसाठी खार पोलिसांनी बेड्या ठोकल्या ती तरुणी तिची बहीण

मुंबई : देशाच्या कॉर्पोरेट जगतातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या इंद्राणी मुखर्जीला (४५) ज्या तरुणीच्या हत्येसाठी खार पोलिसांनी बेड्या ठोकल्या ती तरुणी तिची बहीण नसून पोटची मुलगी होती, अशी धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली आहे. शीना बोहरा (२२, हत्या झाली तेव्हाचे वय) ही इंद्राणी व तिचे पहिले पती सिद्धार्थ दास यांचे अपत्य होते. २४ एप्रिल २०१२ रोजी तिची हत्या झाली. आणखी धक्कादायक बाब ही की शीनाच्या हत्येसाठी इंद्राणीने ड्रायव्हरसह दुसरा पती संजीव खन्ना (५०) याचीही मदत घेतली होती. खार पोलिसांनी बुधवारी खन्नाच्याही मुसक्या आवळल्या. त्याला कोलकातातून अटक करण्यात आली. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाईल. इंद्राणीने पोटच्या मुलीची हत्या का केली, याबाबत खार पोलीस कसून तपास करीत आहेत. हे आॅनर किलिंग असावे किंवा शीनाच्या नावे असलेली इंद्राणीची मालमत्ता हेही यामागील कारण असावे, असाही पोलिसांचा अंदाज आहे.दोन महिन्यांपासून तपास...गेल्या दोन महिन्यांपासून खार पोलीस या हत्याकांडाचा गोपनीयरीत्या तपास करीत होते. इंद्राणीचा ड्रायव्हर राय याला खार पोलिसांनी शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे ७.६५ बोअरचे पिस्टल सापडले होते. याच शस्त्राबाबत चौकशी करताना खार पोलिसांना शीना हत्याकांडाची कुणकुण लागली. पुढे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यात त्याने शीना हत्याकांडाचे सर्व तपशील दिले. त्याचा दावा पडताळून पाहिल्यानंतर पोलिसांनी इंद्राणीला गजाआड केले. इंद्राणी, खन्ना व वाहनचालक श्याम मानव मनोहर राय या तिघांनी मिळून शीनाची हत्या केली. वांद्र्याच्या नॅशनल महाविद्यालयासमोरून या तिघांनी तिचे अपहरण केले. कारमध्येच गळा आवळून तिला ठार मारले. पुढे रायगड, पेण तालुक्यातील गागोदे या विनोबा भावेंच्या जन्मगावी एका दरीत तिचा मृतदेह पेट्रोल शिंपडून जाळला, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.