लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड (जि.सातारा) : ‘खासदार राजू शेट्टी यांनी काढलेली आत्मक्लेश यात्रा ही शेतकऱ्यांसाठी नव्हती. ती तर मला त्रास देण्यासाठी काढलेली ‘सदाभाऊ क्लेश’ यात्रा होती,’ असा टोला कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना लगावला.कऱ्हाड येथे आढावा बैठकीसाठी आलेले खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.‘खरंतर चळवळीत योगदान नसणाऱ्या लोकांनी शेतकरी संघटनेतील वातावरण गढूळ केले, मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये सहभागी असल्याने मी शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन काम करीत आहे. पुणे येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत तुमच्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. तुम्हाला ४ जुलैपर्यंत मत मांडण्याचा अल्टिमेटम दिलाय, याकडे लक्ष वेधले असता खोत म्हणाले, ‘मी प्रसारमाध्यमातून ही बातमी वाचली आहे.
आत्मक्लेश नव्हे; ‘सदाभाऊ क्लेश’ यात्रा
By admin | Updated: July 1, 2017 07:32 IST