शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 13:50 IST

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने माजी सरकारी वकील उज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसने 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उकरुन काढला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दावा केला की, 26/11 हल्ल्यात शहीद झालेले IPS अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्यावर कोणत्याही दहशतवाद्याने नाही, तर RSS समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या घाडल्या आणि ही गोष्ट देशद्रोही उज्ज्वल निकम यांनी लपवून ठेवली. देशद्रोही व्यक्तीला तिकीट देणारा भाजप देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा पक्ष आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

यंदाच्या लोकसभा निवडुकीत भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी उत्तर मध्य मुंबईतून निवृत्त सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujwal Nikam) यांना उमेदवारी दिली आहे. निकम हे तेच सरकारी वकील आहेत, ज्यांच्यामुळे दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा झाली. निकम यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी दिली आहे. आता इतक्या वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस निकम यांच्यावर गंभीर आरोप करत आहे. 

फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवारमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, उज्ज्वल निकमसारख्या देशभक्ताला आम्ही तिकीट दिले, त्यामुळे काँग्रेस नेते उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबची बदनामी केल्याचे सांगतात. म्हणजे काँग्रेसला मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्या अजमल कसाबची चिंता आहे. आमची महायुती उज्ज्वल निकमांसारख्या देशभक्तासोबत आहे, तर महाविकास आघाडी अजमल कसाबसारख्या दहशतवाद्यांसोबत आहे. कोणाच्या पाठीशी उभे राहायचे हे मतदाराने ठरवावावे.

भाजप नेते शेहजाद पूनावाला यांनीही काँग्रेसवर टीका केली. ते म्हणतात, आता मला समजले की, काँग्रेस पक्षाला थेट पाकिस्तानमधून आशीर्वाद का येत आहेत. विजय वडेट्टीवार यांनी 26/11 प्रकरणी पाकिस्तानला क्लीन चिट दिली. शहीद हेमंत करकरे यांची हत्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नाही, तर हिंदूंनी केली आणि त्याला लपवण्याचे काम उज्ज्वल निकम यांनी केले, असे त्यांचे म्हणणे आहे. हे तेच उज्ज्वल निकम आहेत, ज्यांनी राष्ट्रहितासाठी आपल्या वकिलीतून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला फासावर नेले. नक्षलवाद्यांना शहीद म्हणणारे आणि लष्कराला बलात्कारी म्हणणारेच खरे देशद्रोही आहेत. राष्ट्रीय धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवरही काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करत आहे, म्हणूनच आज पाकिस्तान सातत्याने काँग्रेसच्या समर्थनार्थ पुढे येत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUjjwal Nikamउज्ज्वल निकम