शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

"अडीच वर्षं नव्हे, तर 6 महिन्यांतसुद्धा..."; मंत्रीपदासंदर्भात शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत काय घडलं? शिरसाटांनी सगळंच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 20:19 IST

शिवसेनेत मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आता नवे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. "हो... हे सत्य आहे," असे शिरसाट यांनी म्हटले आहे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 12 मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेनेत मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आता नवे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. "हो... हे सत्य आहे," असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले शिरसाट? -शपथविधी समारंभानंतर, अडीच-अडीच वर्षांची चर्चा झाल्याचे समजते, काय आहे यातील सत्य? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, शिरसाट म्हणाले, "हो... हे सत्य आहे. शिंदे साहेबांनी सर्वांना बोलावून आमची मिटिंग घेतली आणि सर्वांना सांगितले की, आपण चांगले काम करायला हवे. हा अडीच वर्षां कार्यकाळ असणार आहे. जर चांगले काम केले नाही, तर अडीच वर्षांचीही आवश्यकता नाही. सहा महिन्यांतही तुम्हाला घरी बसवले जाईल, असा थेट इशारा त्यांनी सर्वच मंत्र्यांना दिला आहे." 

यावेळी, मिळालेल्या मंत्रीपदासंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, "आपल्याला माहीत आहे की, मला मंत्रीपद मिळेल याची चर्चा होती. अखेर शिंदे साहेबांनी मला न्याय देण्याची भूमिका घेतली, आणि मला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मला मिळालेल्या संधीचा योग्य वापर कसा होईल आणि लोकांना न्याय कसा देता येईल या भावनेतून मी काम करणार आहे."

उदय सामंतही स्पष्टच बोलले -अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, "राज्याचे आमच्या शिवसेनेचे नेते, अडीच वर्ष कशाला? उद्या जर दोन महिन्यांनंतर आम्ही परफॉर्मन्स दिला नाही आणि त्यांनी सांगितले की, मंत्रीमंडळातून थांबावे लागेल, तरदेखील आम्ही थांबायला हवे. त्यासाठी अडीच वर्षं कशाला? आमची फरफॉर्मन्स देण्याची जबाबदारी आहे. आमच्यावर चांगले काम करण्याची जी जबाबदारी शिंदे साहेबांनी टाकली आहे, त्याला आम्ही पात्र ठरायला हवे. जर आम्ही पात्र ठरलो नाही आणि शिंदे साहेबांनी दोन महिन्यांनी जरी सांगितले की, थांबलं हवे तर आम्ही थांबायला हवे. त्यासाठी प्रतिज्ञापत्राची काय गर?" 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना