ठाण्याच्या धसई गावात कॅशलेस व्यवहाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. या अत्यंत दुर्गम भागात कॅशलेस व्यवहार शक्य होईल का, असा प्रश्न पडला होता. व्यापाऱ्यांनी कॅशलेससाठी स्वाइप मशिन घेतले; मात्र खरेदीसाठी ग्राहकांकडे पुरेशी डेबिट कार्ड नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे गाव शंभर टक्के कॅशलेस झाल्याचे वृत्त काही दिवसांपासून माध्यमांतून गाजत आहे. वस्तुत: ते पूर्णत: कॅशलेस झाल्याचे दिसत नाही. मात्र गावाचे नाव देशभरात गेल्याने आता ग्रामस्थांनीच डिजिटल व्यवहारांसाठी एकजुटीने प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी डेबिट कार्ड मिळवणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे कॅशलेसचा संथगतीने सुरू झालेला गाडा आता वेगाने पुढे सरकतो आहे. ग्रामस्थांची इच्छाशक्तीच वाढल्याने कॅशलेस व्यवहार सोपे झाले आहेत.गाव : धसईजिल्ह्याच्या ठिकाणापासून अंतर : ३५ किलोमीटर.बॅँका, पतसंस्थांची संख्या : ३पोस्ट आॅफिस : होयएटीएम केंद्र : १वाहतूक सुविधा : एसटी बस/रिक्षा/खासगी जीपइंटरनेट सुविधा : आहेकनेक्टिव्हिटी : अधूनमधून नेटवर्कची समस्यावीजपुरवठा : भारनियमन फारसे नाही.कॅशलेस व डिजिटल व्यवहार : सुमारे ५०० ग्रामस्थ नियमित करतात.दोन महिन्यांत कॅशलेस व डिजिटल व्यवहार वाढले का? : हो, गेल्या दोन महिन्यांत डिजिटल व्यवहार वाढले आहेत़ आता स्थानिक बँकेतर्फे आणखी डेबिट कार्ड वाटपाचे काम हाती घेण्यात आले आहे.6000लोकसंख्या2000स्मार्टफोनधारक 75%साक्षरताकॅशलेसची संकल्पना लगेच आत्मसात करणे कठीण होते. पण निश्चय केला, की काहीच असाध्य नाही हे वाढत असलेल्या कॅशलेस व्यवहारांतून स्पष्ट होते. धसई गाव हे राज्यातील प्रमुख कॅशलेस गावांपैकी पहिले गाव झाले. तो मान गावाला मिळाला. आता हे व्यवहार जास्तीत जास्त कसे वाढतील, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. - अशोक घोलप मुरबाड तालुक्यातील धसई या गावात कॅशलेस व्यवहाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता हे गाव हळूहळू रोखमुक्त होण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते करताना अडचणी अनेक होत्या; पण त्यावर योग्यरीत्या मात केली गेली. गावातील सर्व व्यवहार कॅशलेस करण्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल.- संजय भानुशालीधसई गावाची पहिली ओळख ही प्रसिद्ध नेते शांताराम घोलप यांच्या नावाने होती. आता याच गावाची सर्वांना नव्याने ओळख झाली आहे, ती कॅशलेस गाव म्हणून. या दोन्ही नावे जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता प्रत्येक ग्रामस्थ डेबिट कार्डासाठी बँकेत अर्ज करीत आहे. कार्ड आल्यावर प्रत्येकजण कॅशलेस व्यवहाराचा प्रयत्न करतो आहे. - कैलाश घोलपठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांनी, गावांनी किंवा वस्त्यांनी कॅशलेससाठी साधा प्रयत्नही केलेला नाही. मात्र, अतिदुर्गम भागातील धसई गावाने हे धाडस केले. कॅशलेस हा शब्दही गावातील नागरिकांना नवा होता. या सकारात्मक बदलावर टीका न करता, त्यातील उणिवा सतत समोर न आणता ही योजना अपयशी ठरणार नाही, यावर लक्ष केंद्रित केले पाहीजे.- अॅड. तुषार साटपेग्रामस्थ आत्तापर्यंत रोखीने व्यवहार करीत होते. कॅशलेस यंत्रणात्यांना माहीतही नव्हती. एवढेच नव्हे, तर कोणत्याही व्यापाऱ्याकडे स्वाइप मशीन नव्हते. आता प्रत्येकाकडे मशीन आले आहे आणि प्रत्येक ग्रामस्थाकडे डेबिट कार्ड येते आहे. ते सर्वांकडे आल्यावर खऱ्या अर्थाने गाव कॅशलेस होईल. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे आहेत. - दीपाली वाणी
अद्याप पूर्णत: कॅशलेस नाही
By admin | Updated: January 1, 2017 03:12 IST