शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बुलेट नव्हे, बॅलेट चालविणार

By admin | Updated: October 14, 2014 00:57 IST

सामान्य नागरिकांप्रमाणेच गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनासुध्दा भारतीय लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व कळले आहे. त्यामुळेच बुलेट ऐवजी बॅलेटचा वापर करून गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षलवादी

आत्मसमर्पित नक्षलवादी : चार महिलांसह २५ जणांना ओळखपत्र दिलेगडचिरोली : सामान्य नागरिकांप्रमाणेच गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनासुध्दा भारतीय लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व कळले आहे. त्यामुळेच बुलेट ऐवजी बॅलेटचा वापर करून गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षलवादी येत्या १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी गडचिरोली पोलिसांनी २५ आत्मसमर्पित नक्षल्यांना भारत निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र उपलब्ध करून दिले आहे. यात ४ महिलांचा समावेश आहे.विशेष म्हणजे यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ६२ आत्मसमर्पित नक्षल्यांनी मतदान केले होते. राज्यात येत्या १५ आॅक्टोबर २०१४ रोजी मतदान होत आहे. नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकावा, असा फतवा नक्षल्यांनी काढल्यानंतर त्यांच्याच एकेकाळच्या सहकाऱ्यांनी नक्षल्यांना घरचा आहेर दिला आहे. बंदुकीच्या बळावर सशस्त्र क्रांतीची भाषा करणाऱ्या आणि भारतीय राजसत्तेला आव्हान देणाऱ्या नक्षल्यांना लोकशाहीचे महत्त्व कळले आहे. १५ ते २० वर्षे नक्षल चळवळीत काम केल्यानंतर या चळवळीचा फोलपणा दलम सदस्यांच्या लक्षात आला आहे. राजसत्तेचे केवळ दिवास्वप्न दाखवून बंदूक आणि हिंसेच्या बळावर सामान्य आदिवासींची हत्या करण्यालाच या चळवळीने प्राधान्य दिले आहे. विचारहीन असलेल्या या चळवळीत होणारी कुचंबना, आरोग्याच्या समस्या, सदैव भटकंती, अंतर्गत घुसमट आणि कायम मृत्यूचे भय यामुळे मोठ्या संख्येने नक्षलवादी दलम सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत.एकीकडे आत्मसमर्पित नक्षलवादी लोकशाहीवर विश्वास दाखवून मतदानात भाग घेत असताना सामान्य नागरिकांनीही नक्षल्यांच्या दबावाला बळी न पडता मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)