डोंबिवली : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिआॅनविरोधात येथील एका सामाजिक महिला कार्यकर्तीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सनीविरोधात गुरुवारी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिने एका संकेतस्थळावर अश्लील व भावना भडकविणारी छायाचित्रे टाकली आहेत. त्याविरोधात तिच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, हे प्रकरण सायबर क्राइम शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी स्पष्ट केले. तक्रारदाराने यासंदर्भात संकेतस्थळावरील दृश्यांची छायाचित्रे पोलिसांना दिली आहेत. या प्रकरणी सनीला अटक होण्याची शक्यता असून, पाच वर्षांचा तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. (प्रतिनिधी)
सनी लिआॅनविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा
By admin | Updated: May 16, 2015 02:48 IST