शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र सदस्यांची समिती नेमा

By admin | Updated: February 7, 2017 05:20 IST

जलयुक्त शिवार अभियान हे मुख्यमंत्र्यांची संकल्पना असल्याने त्यांच्याविरुद्ध कोणताही सरकारी अधिकारी जाणार नाही, असा टोला सरकारला लगावत,

मुंबई : जलयुक्त शिवार अभियान हे मुख्यमंत्र्यांची संकल्पना असल्याने त्यांच्याविरुद्ध कोणताही सरकारी अधिकारी जाणार नाही, असा टोला सरकारला लगावत, उच्च न्यायालयाने जलयुक्त अभियानाचा अभ्यास करण्यासंदर्भात नेमण्यात येणाऱ्या समितीमध्ये जास्तीत जास्त स्वतंत्र तज्ज्ञ सदस्यांचा समावेश करा, अशी सूचना राज्य सरकारला केली. राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबवताना शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला नाही, तसेच ‘एन्वॉयरोन्मेंट इम्पॅक्ट असेसमेेंट स्टडी’ ही केला नाही. या योजनेमुळे पर्यावरणचे नुकसान होणार असल्याने, याचा सखोल अभ्यास करूनच ती राबवण्याचा आदेश सराकारला द्यावा, अशी मागणी पुण्याचे प्राध्यापक एच. एम. देसरडा यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. डिसेंबर महिन्यात या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला जलयुक्त शिवार अभियानाचा अभ्यास करण्यासाठी व याचिकाकर्त्यांच्या सूचना विचारात घेण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती ३१ जानेवारीपर्यंत नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते, तसेच या संदर्भातील अहवाल सादर करण्यासही सांगितले होते.सोमवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी सरकारने अद्याप तज्ज्ञांची समिती नियुक्त केली नसल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली. त्यावर मुख्य सरकारची वकिलांनी समिती नेमण्याची प्रक्रिया सुरू असून, आचारसंहितेमुळे आदेश पारित करण्यात आला नसल्याचे खंडपीठाला सांगितले, परंतु उच्च न्यायालयाने त्यांचे हे म्हणणे मान्य करण्यास नकार दिला. ‘डिसेंबरमध्ये आदेश दिला. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आचारसंहिता आडवी येऊ शकत नाही, हे सांगण्याची आवश्यकता नाही. समिती नियुक्त करण्याचा निर्णय आत्ताच घ्यायला हवा. समितीमध्ये बहुतांशी स्वतंत्र तज्ज्ञ सदस्यांचा समावेश केला, तर योग्य ठरेल. कारण ही योजना मुख्यमंत्र्यांची संकल्पना आहे. त्यामुळे कोणताही सरकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध जाणार नाही,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले. (प्रतिनिधी)